शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अधिक रुग्ण आढळणाऱ्या भागात कोरोना चाचणी मोहीम - डॉ. भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

जिल्हाधिकारी डाॅ. भारूड म्हणाले की, रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूम तयार करण्यात येत असून तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष तयार ...

जिल्हाधिकारी डाॅ. भारूड म्हणाले की, रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर वॉररूम तयार करण्यात येत असून तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष तयार करण्यात येत आहे. या कक्षाद्वारे प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तींची माहिती घेण्यात येईल. कोरोनाविषयक औषधे मुबलक प्रमाणात आहेत. गावात पाचपेक्षा अधिक बाधित आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपचाराच्या सुविधा निर्माण कराव्या. गावात नव्याने रुग्ण आढळल्यास त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करावे. अधिक रुग्ण आढळल्यास अलगीकरण कक्ष तयार करावा. प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्ती अलगीकरण कक्षातच दाखल होईल, याविषयी दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात अलगीकरण कक्ष वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ५९२ गावांत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. लसीकरणासाठी ५२ लसीकरण केंद्रे असून त्यापैकी तीन खासगी आहेत. ग्रामीण भागात लसीकरण कमी आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण वाढविणे महत्त्वाचे आहे. ग्रामसेवकांनी गावातील पात्र व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण करून घ्यावे. निवडणूक केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची यासाठी मदत घ्यावी. स्थानिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांचे लसीकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.