शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे सावट आणि खरिपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. नांगरणी, वखरणी आदी कामे सुरू केली ...

ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. नांगरणी, वखरणी आदी कामे सुरू केली आहेत.

कोरोना संकटाशी सामना करत असतानाच शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. बळिराजा यंदा नव्या जोमाने पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला दिसत आहे, मागील पाच-सात वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक दुष्काळी संकटे येत आहेत परंतु बळिराजा अजूनही निसर्गाशी सामना करतो आहे. जमिनीचा पोत, जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर शेतकरी महिनाभर आपापल्या घरामध्येच होता. मात्र, शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही. शासनानेही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम, अटी लागू करून शेतीचे कामे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा शेणखत नांगरणी असली कामे करत आहे. खरीप हंगाम एक महिनाभरात आलेला आहे.

ज्यांच्याकडे बैल आहे, तो बैलाच्या साह्याने तर उर्वरित शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी पंजी वखरणी, मोगडणी करत आहेत. सध्या गहू व हरभराची काढणी झाली असून पेरणी पूर्वमशागत केली जात आहे.

शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल

पूर्वीच्या काळात नांगरणीसाठी एक-दोन नव्हे चार किंवा सहा बैलजोड्या असायच्या. मात्र, आज काल शेतकऱ्यांचा कल आधुनिकतेकडे दिसत आहे. बैलाची संख्या कमी होत आहे. पावसाचे प्रमाण तर दिवसेंदिवस कमी होत असून बैलजोडी सांभाळायचे म्हटले तर बऱ्याचदा चाराटंचाई जाणवते. त्यामुळे बैलजोडी अतिशय कमी शेतकरी ठेवत आहेत. ट्रॅक्टरने शेतीची विविध कामे करून घेत आहेत.