शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पाणी जार घेण्यासही हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

नंदुरबार : कोरोना काळातील संचारबंदी व लॅाकडाऊनमुळे पाणी जार विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भितीमुळे अनेकांनी जार बंद करून ...

नंदुरबार : कोरोना काळातील संचारबंदी व लॅाकडाऊनमुळे पाणी जार विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भितीमुळे अनेकांनी जार बंद करून दिले आहेत. तर संचारबंदीमुळे दुकाने, कार्यालये बंद असल्यामुळे जार विक्री निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जार विक्री बऱ्यापैकी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, विविध ठिकाणची कोविड सेंटर, रुग्णालये या ठिकाणी पाणी जार विक्री बऱ्यापैकी होत असल्यामुळे जार विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला तसा पाणी जार विक्रेत्यांवर देखील झाला आहे. दररोज हजारो लिटर फिल्टर केलेले पाणी विक्री करणारे आज शेकडो लिटरवर आले आहेत. पाणी फिल्टर करण्याचा खर्चदेखील काही जार विक्रेत्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पाणी जार विक्रेत्यांची आर्थिक बाजू डळमळीत झाली आहे. मुख्य उन्हाळ्याचा सिझन हा सर्वाधिक व्यवसायाचा असतो.

लग्न समारंभ नसल्याने मोठा फटका

पाणी जार विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय हा लग्न समारंभांच्या काळात होतो. एका लग्न समारंभाच्या ठिकाणी किमान ३० ते जास्तीत जास्त २०० जार लागत असतात. त्यातून विक्रेते मोठा व्यवसाय करून घेतात. याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येदेखील पाणी जारची मागणी मोठी असते. गेल्या दोन वर्षांपासून लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, सार्वजनिक कार्यक्रमांची बंद झालेली रेलचेल ही बाब लक्षात घेता अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. नजीकच्या काळातदेखील लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी राहणार असल्याचे स्पष्टच आहे.

कोरोनामुळे भीतीच्या वातावरणाचाही परिणाम

कोरोनामुळे बाहेरील वस्तू आणतांना अनेकजण विचार करतात. आणलेच तर सॅनिटाईज करून घेतात. परंतु पाणी कसे सॅनिटाईज करणार हा प्रश्न असतो. त्यामुळे कोरोनाकाळात पाणी जार नको अशी अनेकांची धारणा आहे.

याशिवाय दुकाने, हॅाटेल्स, बिअरबार, इतर कार्यालये सध्या बंद असल्यामुळे तेथे विक्री होणारे पाणी जार देखील बंद ठेवावे लागले आहेत. त्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आला आहे. जूनपासून पावसाळा सुरू झाल्यावर पाणी जार मागणी कमी होणार आहे.