शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना पुन्हा द्विशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा द्विशतक पार केले असून, सोमवारी दिवसभरात २०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा द्विशतक पार केले असून, सोमवारी दिवसभरात २०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक १४७ रुग्ण नंदुरबार शहरातील आहेत. त्याखालोखाल ५९ रुग्ण नवापुरातून समोर आले आहेत.

सकाळी प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील बह्याणे येथे सर्वाधिक १६ रुग्ण आढळून आले. तालुक्यातील दहिंदुले व रनाळे, पाचोराबारी, आराळे, इसाईनगर, सिंधगव्हाण, आष्टे या गावांमध्ये रुग्ण समोर आले आहेत. नंदुरबार शहरातील काली मस्जिद, वृंदावन कॉलनी, नवनाथबाबानगर, देसाईपुरा, महादेवनगर, गाझीनगर, नेहरूनगर, हुडको कॉलनी, रायसिंगपुरा, सरगम कॉलनी, पटेलवाडी, गौतमनगर, माँ सीतानगर, एस.आर.नगर, भगवान गल्ली, सिद्धिविनायक मंदिर, खेडकरवाडा, जयवंत चौक, देसाईपुरा पेट्रोलपंपाजवळ, देसाईपुरा, वेडूगोविंदनगर, हरिभाऊनगर, जुनी भोईगल्ली, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, गणपती मंदिर रोड, गुरुकुलनगर, विमल विहार, वैशालीनगर, सुप्रियानगर, लक्ष्मीनगर, वीर सावरकरनगर, अनिलनगर, रेल्वे कॉलनी, पंचायत समिती, नेहरू पुतळ्याजवळ, सहारा टाऊन, समृद्धी हॉस्पिटल, के.आर. पब्लिक स्कूल, हुडको कॉलनी, बन्सीलालनगर, नंदीनगर, हरिभाऊनगर, बाबा गणपतीनगर, सरगम कॉलनी, कोकणी हिल, गुरुकुलनगर, एम.के. नगर, आराधना कॉलनी, जगतापवाडी, जैन मंदिर, भगत गल्ली, परदेशीपुरा, गाझीनगर, गांधीनगर, राजसारथी सोसायटी, राजीव गांधीनगर, विद्यानगर, पटेलवाडी, सम्राट मंगलतीर्थनगर, वेडुगोविंदनगर, गिरिकुंज सोसायटी, विमल विहार, शार्क पार्क, स्वामी समर्थनगर, जुनी सिंधी कॉलनी, दत्त कॉलनी, इलिस बुक डेपो, एम. एल. टाऊन, बालाजी वाडा, होम आइस्क्रीम, लहान माळीवाडा, बेथेल कॉलनी, करण चौफुली, मंगळबाजार, परदेशीपुरा, अंबिका कॉलनी, नगरपालिका जुन्या इमारतीसमोर, सुयोग हॉस्पिटल येथील रुग्णांचा समावेश आहे.

नवापुरातील ५२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात देवळीफळी, आंबेडकर चौक, दिवाणी न्यायालय, वडकळंबी आश्रम, शेफाली पार्क, नगरपालिकेजवळ, आदर्शनगर महादेव गल्ली, साईनगरी, प्रभाकर कॉलनी, भोईगल्ली, मुसलमान मोहल्ला, जनता पार्क, नेहरूनगर, मंगलदास पार्क सराफ गल्ली, दत्तमंदिर, महाराणा प्रताप चौक, शीतल सोसायटी गार्डन येथील, तर तालुक्यातील पिंप्राण वावडी, चौकी, करंजवेल, थुवा, भवरे, वडफळी, विसरवाडी, खेकडा, मोग्राणी या गावांमधील रुग्णांचा समावेश आहे.