शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टरद्वारे अवतरली संवैधानिक मूल्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समता, न्याय, स्वांतत्र्य व बंधुत्त्व या संैविधानिक मूल्यांची रुजवात करुन पिढी घडवण्याच्या उद्देशाने शांतीलाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समता, न्याय, स्वांतत्र्य व बंधुत्त्व या संैविधानिक मूल्यांची रुजवात करुन पिढी घडवण्याच्या उद्देशाने शांतीलाल मुथा फाउंडेशनकडून मूल्यवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे़ यांतर्गत जिल्हा मूल्यवर्धन मेळावा गुरुवारी शहरातील दादावाडीत घेण्यात आला़ मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांची मांडणी करत जाणीवांचा जागर केला़मेळाव्याचे उद्घाटन मुथा फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ सेवाभावी शांतीलाल मुथा, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी डॉ़ कांतीलाल टाटिया, दिलीप कांकरिया, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी़आऱ रोकडे, डाएटचे प्राचार्य जालिंदर सावंत, गटशिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता राहुल औटी, विस्तार अधिकारी डॉ़ युनूस पठाण, शेखर धनगर, आऱबी़पाटील, मदनलाल सालेचा, नरेश कांकरिया, भवरलाल कोचर आदी मान्यवर उपस्थित होते़प्रारंभी शांतीलाल मुथा यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्रात १० वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या मूल्यवर्धन उपक्रमाची भूमिक मांडली़ बीड जिल्ह्यातून सुरु झालेला हा उपक्रम राज्यातील ६७ हजार शाळांमध्ये सुरु झाला होता़ यातून लाखो विद्यार्थी संवैधानिक मूल्य समजून घेत आहेत़ विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला असून प्रामाणिकपणा आणि बंधुत्त्व रुजल्याची अनेक उदारहरणे देऊन नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार वर्षात सुरु असलेल्या उपक्रमाबाबत मुथा यांनी विस्तृत माहिती दिली़आमदार डॉ़ गावीत यांनी सांगितले की, एखाद्या ठिकाणी धर्म आणि जात याऐवजी न्याय, समता आणि बंधुत्त्व यांचे शिक्षण देण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे़ यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा येऊन दुसऱ्याला मदत करण्याची भावना निर्माण होते़ नंदुरबार जिल्ह्यात अशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे़ मूल्यवर्धनातून संस्कारीत झालेल्या पिढीचा या अशिक्षित बांधवांना लाभ मिळणार आहे़ शिक्षकांचे काम चांगले झाले आहे़ जिल्ह्यातील शाळांमध्ये मूल्यवर्धनामुळे शिक्षक दिसू लागले हे समाधानकारक आहे़ मुलांना इंग्रजी शिकवा हे कायम सांगत आलो आहे़ या कामामुळे जिल्ह्यात परीवर्तन होईल़मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग विद्यार्थ्यांसाठी नेहमी मुथा फाउंडेशनच्या सोबत असल्याचे सांगितले़मेळाव्यात मूल्यवर्धनाचे शिक्षण देणारे मास्टर ट्रेनर शिक्षक उपस्थित होते़ त्यांनी अनुभवकथन केले़ प्रत्येक शाळेत झालेल्या उपक्रमाची १२ मिनिटाची चित्रफित यावेळी प्रसारित करण्यात आली़ यानंतर व्हिडिओ क्लिप्समधील सादरीकरण, शाळांचे विषय यावर डायटचे प्राचार्य शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मूल्यवर्धन अधिकारी, तालुका आणि जिल्हा समन्वयक, एसएमएफ पदाधिकारी यांच्यात चर्चासत्र घेण्यात आले़ यातून मूल्यवर्धन उपक्रमातील विद्यार्थ्यांमधील अपेक्षित फलनिष्पत्ती आणि सहभाग या शैक्षणिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली़

४या जिल्हा मेळाव्यात २६९ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध मूल्यांवर आधारित पोस्टर तयार करुन पाठवले होते़ सोबत ७५ व्हिडिओ याठिकाणी देण्यात आले़ यात व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अनुभवकथन करत समता, न्याय आणि बंधुत्त्व या मूल्यांची माहिती देत शालेय आणि ग्रामीण जीवनातील अनुभव सांगितले़ सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या पोस्टर्समुळे या मेळाव्यातील विषयांवर गांभिर्याने चर्चा झाली़ देशातील ज्वलंत विषयांना संविधान किंवा राज्यघटनेतील मूल्यांचा असलेला आधार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे़ त्यांच्या या कल्पनाशक्तीला उपस्थितांनी दाद देत कौतूक केले़४चारवर्षापासून शांतीलाल मुथा फाउंडेशनकडून जिल्ह्यात सुरु असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत ९२ हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत़ त्यांना शिक्षण देणाऱ्या ३ हजार ३०० शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी २६७ मास्टर ट्रेनरची निवड करण्यात आली आहे़४दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवल्या जाणाºया या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाचा गुण रुजल्याचे सोदाहरण स्पष्ट करण्यात आले़ तसेच विद्यार्थी स्वच्छता आणि टापटीप तसेच शिस्तीकडे लक्ष देत असल्याचे व्हिडिओत दिसून आले़