शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या कराटे प्रशिक्षणाचा ठेका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातील पर्यवेक्षिका अधिकाऱ्यांसाठी कमीशन गोळा करण्याचा प्रकार ताजा असताना मुलींच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातील पर्यवेक्षिका अधिकाऱ्यांसाठी कमीशन गोळा करण्याचा प्रकार ताजा असताना मुलींच्या कराटे प्रशिक्षणासाठी कम्प्युटर इन्स्टिट्यूटला ठेका दिल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे़ ३० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांची बिले लावून ती वसुल करण्याची तयारी सुरु झाल्याने विभागातील अनागोंदी कारभार समोर आला आहे़जिल्ह्यातील गर्भवती माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, युवती आणि सहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या विकासाची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे आहे़ यातून महिला सक्षमीकरण होऊन कुपोषण दूर सारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते़ मात्र विभागात गेल्या काही वर्षात याउलट चित्र निर्माण झाले आहे़ विभागातील अधिकारी, पर्यवेक्षिका आणि ठेकेदार यांचे अधिक कल्याण होत असल्याने महिला व बालविकास पिछाडीवर पडला आहे़ यातील एक गंभीर प्रकार म्हणजे, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात संबधित विभागाने आदिवासी मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना राबवली होती़ यांतर्गत ‘संस्थां’कडून निविदा मागवत प्रशिक्षण देण्याची तयारी केली होती़ परंतू अखेरीस विभागाने संगणक शिक्षण देणाºया व्यावसायिक संस्थेला कंत्राट देत कामकाज केले होते़३० दिवसांचे हे प्रशिक्षण गेल्या वर्षी मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आल्याचा दावा आहे़ परंतू दुर्गम भागासह जिल्ह्यात सर्व १२ महिला आणि बालविकास प्रकल्प झालेलेच नसल्याचे खुलासे आल्याने संबधित संस्थेचा निधी थांबवण्यात आला होता़ तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत यावर भाष्य करत चौकशी मागणी केली होती़ पुरावे सादर करण्याचे सांगण्यात आले होते़ परंतू महिला व बालविकास विभागाने ठेकेदाराला पाठिशी घालून सारवासारव करत वेळ मारुन नेली होती़तूर्तास निधी नसल्याचे कारण सांगून ठेकेदाराला निधी देण्यात आलेला नाही़ येत्या काळात ठेकेदाराच्या मागणीनुसार निधी वर्ग करण्याचा घाट अधिकारी घालत असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे़जिल्ह्यात नवापुर, शहादा, म्हसावद, तळोदा, अक्कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा, नंदुरबार, रनाळे, धडगाव, खुंटामोडी आणि तोरणमाळ हे १२ प्रकल्प आहेत़ यांतर्गत विभागातून ५ हजार किशोरवयीन आदिवासी मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ यांतर्गत तोरणमाळ येथील प्रकल्पांतर्गत ६३१ मुलींना प्रशिक्षण दिल्याचे पत्र प्रशिक्षण देणारी संस्था राहुल कम्प्युटर इन्स्टिट्यूट नंदुरबार यांनी विभागाला गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिले आहे़ तोरणमाळ सारख्या दुर्गम भागात ६३१ मुलींना प्रशिक्षण दिल्याचे पुरावे मात्र संबधितांकडे तुटपुंजे असल्याचे समोर आले होते़ हीच गत जिल्ह्यातील इतर १२ प्रकल्पांमध्ये आहे़ विशेष म्हणजे त्या-त्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण झाले असल्याचे संमतीपत्र विभागाला दिले आहे़जिल्ह्यातील पाच हजार मुलींसाठी १८ लाख ५० हजार रुपये खर्च झाल्याने ते वसुल करण्यासाठी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचालक ठेकेदार विभागाकडे चकरा मारत आहे़ दुर्गम व अती दुर्गम भागात प्रशिक्षण दिल्याचे पुरावे असल्याचे विभाग सांगत असल्याने प्रशिक्षण घेणाºया मुलींचे प्रात्यक्षिक घ्यावे अशी वारंवार सूचना जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी करुनही प्रात्यक्षिके झालेली नाहीत़