शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक खर्चात आयोगाचे काटकसरीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 13:19 IST

भूषण रामराजे लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात होवू घातलेल्या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूकाही खर्चिक असल्याने निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाकडून ...

भूषण रामराजेलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात होवू घातलेल्या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूकाही खर्चिक असल्याने निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाकडून खर्चाची मागणी केली होती. या नुसार संबधित विभागाने नंदुरबार जिल्ह्यातसाठी केवळ आठ लाख रूपयांचे अनुदान आतापर्यंत दिले आहे. परिणामी निवडणूक आयोग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच शासकीय विभागांमध्ये खर्च कपात झाली आहे. यातून ग्रामपंचायत निवडणूकाही सुटलेल्या नाहीत. नंदुरबार जिल्ह्यात तब्बल ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्यानंतर हालचाली सुरु झाल्या आहेत. गावोगावी होणा-या हालचालींसोबतच प्रशासकीय कामकाजही गती पकडत असून यासाठी लागणारा खर्च अपुरा दिला गेला असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेचे कामकाज मंदावलेले नसल्याचे समोर आले आहे. प्रत्येक गावासाठी खर्चाचे नियोजन सुरु आहे. 

ईव्हीएम, वाहतूक, बॅलेट पेपरवर होतो खर्च   प्रत्येक ग्रामपंचायतीला साधारण ५० हजार रूपयांपर्यंत खर्च होतो. यात स्टेशनरी, बॅलेट पेपर, वाहतूक खर्च, ईव्हीएम भाडे, बॅटरीसाठी खर्च तसेच मतदार याद्यांचा खर्चाचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारे हे खर्च करण्यात येत असल्याने त्यासाठी वेगवेगळे पुरवठादार नियुक्त आहेत. तूर्तास प्रत्येक ग्रामपंचायत निहाय साधारण १० हजार ८०० रूपयांचा खर्च जिल्हा प्रशासनाकडे असल्याची माहिती समोर आली आहे.  

मागील निवडणूकांचा खर्च झाला वसूल जिल्ह्यात २०१९ मध्ये केवळ पाच ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागू करण्यात आला होता. त्यापूर्वी २०१८ व २०१८ मधील कार्यक्रमात लागू करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमासाठीचा पूर्ण खर्च मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील निवडणूकांचा खर्च मिळाला असला तरी यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्च पूर्ण मिळतो किंवा कसे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रशासनाकडून यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो. 

ग्रामपंचायत निवडणूक खर्चाची मागणी निवडणूक आयोगाकडे दिली होती. त्यानुसार अनुदान वर्ग करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार खर्च करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. तशा सूचना संबधित अधिकारी वर्गाला केल्या आहेत.  - बालाजी क्षीरसागरजिल्हा निवडणूक अधिकारी, नंदुरबार.