शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन अभिरूप न्यायलय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:27 IST

महाविद्यालयीन अभिरूप न्यायलय स्पर्धा लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थी कल्याण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विधी ...

महाविद्यालयीन अभिरूप न्यायलय स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्यार्थी कल्याण विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन अभिरुप न्यायालय स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश मलीये, अक्कलकुवा येथील दिवाणी न्यायाधीश ए.डी. करभाजन, नंदुरबार जिल्हा सरकारी वकील अॅड.सुशील पंडित, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी न्या.प्रमोद तरारे यांनी वकिलांना केवळ कायद्याचे ज्ञान असून, चालत नाही तर त्या ज्ञानाच्या वापराचे कौशल्य हे अधिक महत्त्वाचे असते. विद्याथ्र्यानी कायदा शिक्षण घेताना केवळ पुस्तकी अभ्यास न करता कौशल्य गुण वाढविले पाहिजेत असा संदेश दिला. जिल्हा सरकारी वकील अॅड.सुशील पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले. स्पर्धेत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील विधी महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात धुळे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे एस.एम. बियाणी विधी महाविद्यालयाला प्रथम तर नंदुरबार विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्थेच्या महाविद्यालयांना   विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. यातील स्पर्धकांना न्या.ए.डी. करभाजन व अॅड.सुशील पंडित  यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात  आले.