शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आदी तालुके येतात. या वेळी कृषीपंपधारकांकडे वीजबिलापाेटी ५६४ कोटी थकबाकी ...

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आदी तालुके येतात. या वेळी कृषीपंपधारकांकडे वीजबिलापाेटी ५६४ कोटी थकबाकी असून, त्यात ७० कोटी विलंब आकार आहे. तसेच कृषीधोरण योजनेंतर्गत ५६४ पैकी ३४८ कोटी रुपयांचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यातून तीन कोटी २३ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर शहादा विभागांतर्गत १७ कोटी रुपयांची घरगुती व व्यावसायिकांकडे थकबाकी आहे. १५० कोटी पाणीपुरवठा व ६० कोटी स्ट्रीट लाइटचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल वसूल व्हावे, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर बैठका आणि मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. वीजबिल भरणे सुलभ जावे, यासाठी महावितरणतर्फे हप्त्यांचीही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु, या योजनेचा फायदा बहुतांश नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घेतला नाही. शासन निर्णय होईल तो होईल, परंतु थकबाकीदारांनी आपले वीजबिल भरणे आवश्यक आहे. शासनाकडून निर्णय झाल्यास भरलेले बिल वजा केले जाईल. परंतु, तोपर्यंत वीजबिल थकवू नका, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी वीजबिलाचा भरणा केल्यास विद्युत रोहित्रासाठी ताटकळत राहावे लागणार नाही. शिवाय, पिकांनाही योग्य वेळी पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. त्यामुळे वीजबिलांचा भरणा करून वीजकंपनीला सहकार्य करावे.

- के.डी. पावरा, अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, शहादा