शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा ऐनवेळी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा ऐनवेळी रद्द ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर सर्व तयारी पुर्ण करण्यात आली होती. जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात मेळाव्यासाठी व्यासपीठ, मंडप टाकण्यात आला होता. पोलिसांनी वाहनांच्या ताफ्याची रंगीत तालीम देखील दुपारी केली.नंदुरबार पालिकेच्या जलतरण तलावाचे उद्घाटन आणि पालिका इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार, १५ रोजी दुपारी होणार होते. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून तयारी पुर्ण करण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांसोबत सेनेचे ज्येष्ठ नेते व पाच मंत्री देखील येणार होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे नंदुरबारात प्रथमच येणार होते. त्यामुळे पक्षातर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात मेळाव्यासाठीची तयारी पुर्ण करण्यात आली होती. जलतरण तलावाच्या उद्घाटनासाठी उद्यान व टाऊन हॉल परिसर सजविण्यात आला होता. जुन्या कोर्टाच्या आवारात पालिका इमारत साकारली जाणार असल्याने या ठिकाणी भुमीपुजनासाठी देखील तयारी करण्यात आली होती.प्रशासनाने दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्याची रंगीत तालीम देखील घेण्यात आली. परंतु चार वाजता अचानक दौरा रद्द करण्यात आल्याचा संदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बंदोबस्तासाठी पोलिसांना सुचना देणे, बंदोबस्त नेमणे यासह इतर सुचना देण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. परंतु दौरा रद्द झाल्याचे कळाल्यानंतर पुढील नियोजन रद्द करण्यात आले.