शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : नर्मदेचे दहा तर उकईचे पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार-मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत स्वत:चे सिंचन करून घेतले असा आरोप करीत नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील 10 टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले जाईल. उकईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहादा येथील सभेत बोलतांना केले.शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी, नंदुरबार  मतदार संघाचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली त्यात ते बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उमेदवार राजेश पाडवी, डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आदिवासींचे आरक्षण काढणार अशा खोटय़ा अफवा पसरवत आहेत. परंतु जगाच्या पाठीवर कोणीही आदिवासीचे आरक्षण काढू शकत नाही. संविधानाने त्यांना तसे अधिकार दिले आहे. आदिवासी बांधवांना कधी नव्हे एवढय़ा योजना पाच वर्षात राज्य शासनाने दिल्या. वन पट्टे, वनजमिनीचे राहिलेले दावे एक वर्षात निकाली काढू असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जयपालसिंह रावल, अभिजीत पाटील, आरपीआयचे अरविंद कुवर, शिवसेनेचे अरुण चौधरी, तळोदाचे नगराध्यक्ष अजय परदेशी, शहाद्याच्या उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, राजेंद्र गावीत, अभिजित पाटील, अतुल जायस्वाल, डॉ.शशिकांत वाणी, जितेंद्र जमदाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, के.डी.पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील ,रवींद्र राऊळ, बाजार समितीचे संचालक राजाराम पाटील, महेंद्र पाटील, रामभाई पाटील, अशोक टीला पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.