शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

चांदसैली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा जागीच ठार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावाजवळच्या चांदसैली शिवारात  हिंस्त्र बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची घटना शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावाजवळच्या चांदसैली शिवारात  हिंस्त्र बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घोड्यावर हल्ला झालेल्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा नजरेस पडल्याने हा हल्ला बिबट्याने केला असावा असा अंदाज आहे.  चांदसैली शिवारातील राहुल राजेंद्र पाटील  शेतातील  घोड्यावर  बिबट्याने हा हल्ला केल्याची माहिती देण्यात आली आहे.  रविवारी दुपारच्या सुमारास शेतात फवारणी करणाऱ्या मजुरांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतकरी प्रवीण सुभाष पाटील यांना घटनेची माहिती दिली. ठार झालेल्या घोडा हरभ-याच्या शेतातुन लांब अंतरावर ओढून केळीच्या शेतात घेऊन जात त्याच्यावर ताव मारल्याचे चित्र दिसून आले.  जमिनीवर उमटलेले पायाचे ठसे हे बिबट्याचेच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. सदर ठसे वनविभागामार्फत घेऊन तज्ज्ञांकडे पाठविल्यानंतरच या बाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.  ब्राह्मणपुरी परिसरात केळी पपईची मोठ्या प्रमाणात शेती करतात त्यात रब्बी पीक म्हणून हरभरे, गहू ची लागवड करण्यात आली आहे. या पिकांमध्ये हिंस्र प्राणी लपून बसत असल्याने शेतक-यांची तारांबळ होत आहे.