शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या उत्सवात कष्टकरी घामातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 11:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकशाही उत्सवातला मतदान हा महत्वाचा भाग असून यात सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकशाही उत्सवातला मतदान हा महत्वाचा भाग असून यात सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली. जे सरकारी व निमसरकारी सेवेत आहे, त्यांना सुटी घेतली तरी त्यांच्या उदरनिर्वाहावर फारसा फरक पडणार नाही. परंतु गरीब कष्टक:यांनी यासाठी सुटी घेतल्यास त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण परिवारावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या टाळण्यासाठी गरीब कष्टकरी भल्या पहाटे तयारी करीत सकाळी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकटीकरणास योगदान देत त्यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर  घामही गाळला.नेहमीप्रमाणेच रोजंदारीने काम करीत उदरनिर्वाह करणारे उत्सव असला तरी या उत्सवाला फारसे महत्व न देता कामाच्या ठिकाणी वेळेत हजर राहण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. तर बहुतांश गरीब बांधव हे सकाळी लवकरच मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावत वेळेवर कामाच्या ठिकाणी हजर झाले. नंदुरबार तालुक्यातील घुली पळाशी व होळहवेली येथील काही मजूर काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आलेले सिमेंटचे एंगल्स तोडण्याचे काम    करीत आहेत. या कामावरील एकही दिवस सुटल्यास परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे या मजूरांनी सांगितले.  त्यामुळे हे मजूर नेहमीप्रमाणे मतदानाचा दिवस असला तरी या दिवशी दिवसभर कामावर हजर राहिले. परंतु त्यांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी देखील योगदान दिले आहे. सकाळी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावून पोटा-पाण्यासाठी कामाकडे धाव घेतल्याचे या मजूरांनी सांगितले. 

मतदान असले तरी पोटापाण्याचा पश्न सोडविण्यासाठी काही कामगार व कष्टक:यांनी आपापल्या कामांना प्राधान्य देत आधी आपली कामे पूर्ण केली. त्यात नवापूर तालुक्यातील खातगावपासून खांडबारा, ढेकवद या भागातील कष्टकरी चारा व मोळी विकणा:या महिलांनी नेहमीप्रमाणे नंदुरबार शहरात येऊन चारा व मोळी विकल्या. सायंकाळी उशिरापर्यत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे दिवसभरातील संपूर्ण कामेही त्यांनी आटोपत मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम भागातील बहुसंख्य मजूर नंदुरबारात येऊन बांधकामावर बिगारीचे काम करीत आहे. काही मजूर दस:याच्या वेळेस गावाकडे परतले होते, परंतु काही मजूर मतदानाचा दिवस असूनही नंदुरबारात कामावर आहे. त्यात कुंडल ता.धडगाव येथील काही मजूरांचा समावेश असून त्यांनी मतदानाऐवजी रोजगारालाच अधिक महत्व दिले आहे.