शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोनामुक्त गाव मोहीम राबवा - डॉ.राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

जिल्हाधिकारी कार्यालयत आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, ...

जिल्हाधिकारी कार्यालयत आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात एका पथकाद्वारे किमान २०० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावातील सर्व नागरिकांची स्वॅब नमुने संकलित करण्यात यावे. प्रत्येक कोरोनाबाधित संस्थात्मक अलगीकरणात राहील, याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ५० पर्यंत खाली आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

लसीकरणासाठी दररोज १६ गावांत शिबिराबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, व्यावसायिकांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करावी. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात लसीकरण मोहिमेला वेग द्यावा. या दोन्ही तालुक्यांत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करून रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करावे.

यावेळी संस्थात्मक अलगीकरण, ऑक्सिजन खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी, लसीकरण शिबिरांचे आयोजन, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.