शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात खैरच्या लाकडासह कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

नवापूर तालुक्यातील कारेघाट व खेकडा रस्त्यावरून खैरच्या लाकडाची तस्करी होणार असल्याची माहिती नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांना ...

नवापूर तालुक्यातील कारेघाट व खेकडा रस्त्यावरून खैरच्या लाकडाची तस्करी होणार असल्याची माहिती नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांना मिळाली होती. त्यानुसार वनरक्षक प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, संजय बडगुजर, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, अशोक पावरा, भाग्यश्री पावरा, अनिल पाडवी, वाहनचालक साहेबराव तुंगार, माजी सैनिक विशाल मराठे व वनमजूर आदी वनपथकाने कारेघाट-खेकडा रस्त्यावर पाळत ठेवली. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना संशयास्पद कार दिसली असता त्याचा पाठलाग करून त्याला वनविभागाची गाडी आडवी टाकली. त्याच वेळी अंधाराचा फायदा घेऊन कार (क्रमांक एम.एच.०२ एएल-४९७) तेथेच सोडून खैर तस्करी करणारा फरार झाला. कारमध्ये खैर प्रजातीचे तासतूस केलेले ४३ नग आढळून आले. लाकूड व कार असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज वनअधिकाऱ्यांनी नवापूर वनआगारात पंचनामा करून जप्त केला आहे.

नवापूर तालुक्यातून पश्चिम घाटाची सुरुवात होते. गुजरात सरहद्दीपर्यंत हा परिसर विविध वृक्षराजींनी बहरलेला आहे. विविध प्रकारचे वृक्ष या परिसरात आढळतात. घनदाट जंगल असल्याने याचा फायदा घेऊन या परिसरातून खैर, साग, सिसम आदी लाकडांची चोरटी अवैध वाहतूक केली जाते. रात्री नाक्यावर नियमित पेट्रोलिंग होताना दिसत नाही, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे.

वनविभागाची कारवाई कौतुकास पात्र असली तरी दररोज होणाऱ्या तस्करीवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नवापुरातील जंगल सुरक्षित राखण्यासाठी वनविभागाने कटाक्षाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक दि.वा. पगार (धुळे), नंदुरबारचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे (शहादा), विभागीय वनअधिकारी (दक्षता) उमेश वावरे (धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

खैरची आंतरराज्य तस्करी

पानाचा विडा रंगवण्यासाठी आणि पानमसाल्याची चव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या काताच्या उत्पादनासाठी बेकायदा खैरच्या लाकडाची तस्करी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात फोफावली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील परिसरात घनदाट जंगलात खैर, साग, सिसम या लाकडांची तस्करी होते. या झाडांची चोरटी व अवैध वाहतूक दररोज होते. परंतु कारवाई मात्र बोटावर मोजण्याइतकीच होते. नवापूर वनविभागातील वनक्षेत्रपालासह इतर पदे रिक्त असल्याने तस्करांची दहशत वाढत आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

सीमावर्ती नाक्यावर वनविभागाचे दुर्लक्ष

गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खैर लाकडाची अवैध वाहतूक व तस्करी होते. खैर, सागवान, सिसम आदी प्रजातीचे लाकूड तोड करून नवापूर सीमावर्ती भागामध्ये साठवण करून त्याचे फर्निचर तयार करून आंतरराज्य तस्करी केली जाते. खैर लाकडाची बाजारात मोठी मागणी असल्याने महाराष्ट्रातून खैरची मध्यरात्री तस्करी केली जाते. महाराष्ट्र-गुजरात राज्यातील वनविभागाने संयुक्त कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नवापुरात वनक्षेत्रपालाचा अतिरिक्त कारभार

नवापूर वनविभागातील वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांची बदली झाल्याने नवापूर वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार चिंचपाडा येथील वनक्षेत्रपाल आर.डी. पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. सक्षम अधिकारी व रिक्त पदाचा फायदा लाकूड तस्कर घेत आहेत. नवापूर वनविभागात वनक्षेत्रपालपदी तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.