शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची खाट घेऊन या, झाडावर सलाईन लावून घ्या.. टायफाईड साथीवर उपचार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST

आठशे लोकवस्तीच्या या गावातील निम्मा गाव साथीच्या आजाराने हैराण झाला. शेवटी गावातील डॉ. नीलेश वळवी यांना गावकऱ्यांनी बोलावले आणि ...

आठशे लोकवस्तीच्या या गावातील निम्मा गाव साथीच्या आजाराने हैराण झाला. शेवटी गावातील डॉ. नीलेश वळवी यांना गावकऱ्यांनी बोलावले आणि तंबू ठोकून इथेच तात्पुरते रुग्णालय सुरू केले. आता या गावातीलच नाही तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील १४-१५ गावांमधील ९०० हून अधिक टाईफाईडच्या रुग्णांना गेल्या गेल्या १५ दिवसात या ठिकाणी उपचार केल्याचे ते सांगतात. यासाठी त्यांची टायफाईडची चाचणी केली जाते, कोविडची चाचणी मात्र केली जात नाही. अन्यत्र कोविडच्या चाचणीशिवाय प्रवेश नाही, त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्यांची संंख्या वाढली आहे. गुजरातमधील सायला, मोग्रणी, टाकली, वडिली, भिलभवाली, नासेरपूर, मोगलीपाडा या निझर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिपलोद, भवाली, शिवपूर, लोय, धानोरा गावचे शेकडो रुग्ण या ठिकाणी येथे आहेत. गावकऱ्यांनी उभारलेल्या मंडपासह प्रत्येकाच्या घरापुढील मंडपात रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र दिसते. अनेक जण झाडाला सलाईन अडकवून झाडाखाली बसून असलेले दिसले. एकाच कुटुंबातील अनेक जणांवर एकत्र उपचार घेताना भेटले.

खाट घेऊन या आणि सलाईन लावून जा...

एकेका कुटुंबातील तीन-चार सदस्यही येथे उपचार घेत आहेत. येणाऱ्याने आपली खाट घेऊन यायची हीच अट. त्यामुळे एकच रुग्ण असलेले आणि चारचाकी नसलेले दुचाकीवर आपापली खाट घेऊन येथे येत आहेत. सकाळी ११ ते रात्री ११ असा १२ तास हा दवाखाना चालतो. तीन दिवसांचे एका रुग्णाकडून उपचाराचे १,८०० रुपये घेतले जातात. त्यात त्यांना इंजेक्शन, तीन सलाईन लावले जातात. गेल्या १५ दिवसात एकही रुग्ण दगावला नाही. अशाप्रकारे ९०० हून अधिक रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतल्याचे स्थानिक सांगतात.