शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पथकाने धाड टाकताच वऱ्हाडींची झाली पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

नंदूरबार : २५ पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करताच पथकाने निंबेल (ता. नंदुरबार) व नंदूरबारातील गवळीवाडा परिसरात ...

नंदूरबार : २५ पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करताच पथकाने निंबेल (ता. नंदुरबार) व नंदूरबारातील गवळीवाडा परिसरात धाड टाकून वऱ्हाडींना ताब्यात घेतले. आयोजकांसह बँडवाल्यांवरही तालुका व शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. २ मे रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

निंबेल (ता. नंदूरबार) येथे आयोजित विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक लोकांची गर्दी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नियुक्त पथकाला मिळाली. पथकाचे अधिकारी तथा महसूल मंडळ अधिकारी प्रशांत नीळकंठ देवरे यांनी पथकासह लग्नमंडपात धाव घेतली. त्याठिकाणी शासकीय वाहन पाहताच वऱ्हाडी मंडळींमध्ये धावपळ उडाली. काहींनी शेजारच्या घरांमध्ये धाव घेतली तर काहींनी तेथून काढता पाय घेतला तरीही पथकाच्या निदर्शनास तेथे ६० ते ६५ जण आढळले. त्यातील काहींच्या तोंडावर मास्कदेखील नव्हता.

याबाबत प्रशांत देवरे यांनी फिर्याद दिल्याने अशोक बारकू पाटील, अमृत अशोक पाटील, योगीताबाई अमृत पाटील, गोविंदा साहेबराव पाटील, संगीताबाई गोविंदा पाटील (सर्व रा. निंबेल), बोधीसत्त्व खंडू पिंपळे (बँड मालक रा. वैंदाणे) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कमलाकर चौधरी करत आहेत.

दुसरी घटना नंदूरबारातील गवळीवाडा भागात घडली. याभागात देखील २५ पेक्षा अधिक व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती पथकाचे प्रमुख तथा निवासी नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांना मिळाली. त्यांनी पथकासह विवाहस्थळी धाव घेत तपासणी केली असता तेथे ५० ते ६० जणांची उपस्थिती दिसून आली. त्यांच्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन नव्हते. त्यामुळे भीमराव बोरसे यांनी कारवाई करत फिर्याद दाखल केली.

त्यावरून विशाल सुधाकर गवळी, लक्ष्मी गिरजाप्पा गवळी, गिरजाप्पा चिमाजी गवळी, रत्नाबाई गिरजाप्पा गवळी (सर्व रा. गवळीवाडा, नंदूरबार), अरुण आबाजी गवळी, संगीता अरुण गवळी, ज्ञानेश्वर अरुण गवळी (सर्व रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विजय चौधरी करत आहेत.