शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तक प्रकाशन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश आदिवासी पट्ट्यात नक्षलवादाने ठाण मांडले आहे. जंगलावर जीवन असलेल्या आदिवासींना नक्षलवादी वेठीला का धरत आहेत? एखाद्या ...

महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश आदिवासी पट्ट्यात नक्षलवादाने ठाण मांडले आहे. जंगलावर जीवन असलेल्या आदिवासींना नक्षलवादी वेठीला का धरत आहेत? एखाद्या विचारसरणीच्या तत्त्वात आणि आचरणात तफावत का निर्माण होते? आदिवासी समाज पोलीस आणि नक्षल यापैकी कोणाकडे झुकतो आहे? या विचारसरणीच्या प्रभावाने आदिवासी समाज सुखी झाला आहे का? अस्वस्थ करणाऱ्या अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह ‘स्थलांतर’ या विश्वकर्मा प्रकाशित कादंबरीत करण्यात आला आहे. तर मानव जातीचे कल्याण करू पाहणारे आणि त्याचा गर्व वाहणारे वैज्ञानिक, त्यांच्या ज्ञानाचा वापर नफेखोरीसाठी करणाऱ्या कंपन्या, त्यांचे गर्वहरण करणारा निसर्ग आणि या सर्वांमधून वाहत असणारा मानवीय संबंधाचा झुळझुळता झरा यांचे मर्म ओघवत्या भाषेत ‘चिरंतन’ या ग्रंथाली प्रकाशित कादंबरीत मांडण्यात आले आहे. विज्ञान भानासोबत मूल्यभान जागवणारी ही एक कादंबरी आहे. त्याप्रमाणे ‘आत्मा आणि इतर कथा’ या प्रशांत प्रकाशित कथासंग्रहात विविध कथांचा समावेश आहे.

‘चिरंतन’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. उज्ज्वला दळवी व डॉ. चारुता गोखले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रकाशक धनंजय गांगल हेदेखील उपस्थित राहणार आहेत. स्थलांतर या कादंबरीचे प्रकाशन संदीप तापकीर व डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी प्रकाशक मनोहर सोनवणे उपस्थित राहणार आहेत. ‘आत्मा आणि इतर कथा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन माधुरी तळवलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी प्रकाशक प्रदीप पाटील हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.