बोहरा समाज वसाहत विकासकामांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST2021-07-08T04:20:54+5:302021-07-08T04:20:54+5:30

शहादा पालिकेचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी संयुक्तपणे दाऊदी बोहरी समाजाच्या वसाहतीचा विकास व्हावा याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. या ...

Bohra community deprived of colony development works | बोहरा समाज वसाहत विकासकामांपासून वंचित

बोहरा समाज वसाहत विकासकामांपासून वंचित

शहादा पालिकेचे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी संयुक्तपणे दाऊदी बोहरी समाजाच्या वसाहतीचा विकास व्हावा याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. या वसाहतीचा विकास करण्यासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या मान्यवरांनी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात गेल्या साडेचार वर्षांपासून विकासकामांचे पर्व सुरू आहे. रस्ते, भुयारी गटारी या कामांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळालेली आहे. कधी नव्हे एवढा विकास या साडेचार वर्षात शहरातील प्रत्येक वसाहतीत सुरू आहे. त्यामुळे दाऊदी बोहरी समाज वसाहतीत रस्ते, भुयारी गटारींचे काम प्रशासनाच्या विकासकामांतर्गत करण्यात यावे, अशी मागणी दाऊदी बोहरी समाजाने नगराध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.

नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी दाऊदी बोहरी समाजाच्या सर्व प्रमुख लोकांच्या मांडलेल्या समस्या विचारात घेऊन या वसाहतीत विकासकाम लवकरच सुरू करणार असून, राजकीय व्यक्ती द्वेष न ठेवता समाजाभिमुख कार्य करणार आहोत. गावाचा विकास हाच पालिकेचे ध्येय असल्यानेदेखील नगराध्यक्ष पाटील यांनी म्हटलेले आहे.

शहरातील दाऊदी बोहरी समाज वसाहतीत विकासकामे करण्यात यावी. याबाबत निवेदन देण्याकरिता लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या घरी मौलाना जनाब अमिल शेख मुस्तफा राईपूरवाला, जोयेब इज्जी. सज्जाद इजी, शब्बीर इज्जी. मुस्ताली मैमुंन, हुसेन इज्जी. जाहिद कादियान, मुर्तजा इज्जी. मुस्तफा बद्री यांनी भेट घेऊन विकासकामे करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Bohra community deprived of colony development works