शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

तळोदा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला तालुका असून, दुर्गम भागातील गावांमध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले प्रस्थ निर्माण केले आहे. काही ...

तळोदा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला तालुका असून, दुर्गम भागातील गावांमध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले प्रस्थ निर्माण केले आहे. काही बोगस बंगाली डॉक्टर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून रुग्णांवर अनधिकृतपणे उपचार करीत आहेत. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, उपचारासाठी या डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. या बोगस डॉक्टरांमध्ये मोठ्या प्रमाणात बंगाली डॉक्टरांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे.

दुर्गम व अतिदुर्गम भागात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्यामुळे व रुग्णालयेही लांब असल्याने हे रुग्ण बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. परंतु या डॉक्टरांकडे कोणत्याच प्रकारची पदवी किंवा अधिकृत प्रशिक्षण नसतानाही ते सलाईन आणि इंजेक्शनचा वापर करून रुग्णांची फसवणूक करीत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोना संशयित रुग्णांनाही या डॉक्टरांकडून सरसकट उपचार दिले जात आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर कोरोनासदृश रुग्णांना कोरोनाच्या विविध चाचण्या करून घेण्याचा सल्ला देतात. मात्र हे बोगस डॉक्टर रुग्णांना सरसकट उपचार देत असल्याने रुग्णांचा त्यांच्याकडील ओढा वाढला आहे. कोणत्याही चाचणी, तपासणी न करता उपचार मिळतात म्हणून रुग्णांचाही त्यांच्याकडे कल असतो. ग्रामीण भागातील बहुतेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना या डॉक्टरांचे उपचार परवडतात. परंतु थातुरमातुर उपचारांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. या डॉक्टरांच्या अशा उपचारामुळे अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागत असल्याचा प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, तळोदा तालुक्यातील मालदा येथे कोरोना तपासणी शिबिरात १०८ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बोगस डॉक्टरांसंदर्भात ओरड सुरू झाली. मालदा येथे वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस बंगाली डॉक्टर पॉझिटिव्ह असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, राणीपूर या गावांतही अशा बंगाली डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली असून, रुग्णांवर अनधिकृतपणे उपचार करण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. याबाबत गावातील काही सूज्ञ नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या; मात्र स्वस्त व घरपोच, गावात उपचार मिळत असल्याने तक्रार करणाऱ्या नागरिकांनाही विरोधाला सामोरे जावे लागण्याचा अनुभव आहे.

आमदार राजेश पाडवींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या व जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तळोदा व शहादा येथील ग्रामीण भागात ना कोणती पदवी ना कुठली शाश्वती असतानादेखील मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर भटकंती करीत आहेत. स्थानिक व आदिवासी भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जीविताशीही खेळ करत असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपले बस्तान मांडून असलेले परप्रांतीय बोगस डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी खेळ करीत आहेत. हा प्रकार धक्कादायक असून, गोरगरीब रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टर बॅगा घेऊन फिरत आहेत. अशा बोगस डॉक्टरांकडून नागरिकांनी उपचार घेऊ नये. बोगस डॉक्टरांना गावात येऊ देऊ नये. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

- आमदार राजेश पाडवी

आमच्या मालदा गावात बंगाली बोगस डॉक्टर आहे. गावात बाहेरचे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील अनेक कोरोना रुग्ण असतात. त्यामुळे गावात संसर्ग वाढला आहे. प्रशासनाकडे त्याची तक्रार करण्यात आली असून, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

- गोपी पावरा, ग्रामस्थ, मालदा, ता. तळोदा