शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मंडळाधिकारी व तलाठीत हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 22:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सादर केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे वारंवार नाकारली जात असल्याच्या कारणांवरून टेंभे तर्फे सारंगखेडा येथील तलाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सादर केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे वारंवार नाकारली जात असल्याच्या कारणांवरून टेंभे तर्फे सारंगखेडा येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोघांचा वाद मिटविण्यासाठी पोलीसांना पाचारण करावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकाराची सारंगखेडा आणि परिसरात चर्चा रंगली आहे़
टेंभे तर्फे सारंगखेडा येथील तलाठी जाधव हे गावातील शेतकऱ्यांची शेती सबंधी प्रकरणे घेऊन सारंगखेडा येथील मंडळाधिकारी जुबेर पठाण यांच्याकडे गेले होते़ मात्र मंडळ अधिकारी पठाण यांनी त्या प्रकरणांचा स्विकार केला नाही़ यातून तलाठी व मंडळधिकारी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. बराच वेळ सुरु असलेला हा वाद हाणामारी पर्यंत पोहोचला होता़ दरम्यान मंडळधिकारी यांनी पोलीसांना फोनवरून माहीती देऊन बोलाूवन घेतले होते़ पोलीस ग्रामपंचायत कार्यालयातील मंडळाधिकारी कक्षात पोहोचल्यानंतर मध्यस्थी करुन हा वाद मिटवण्यात आला़ परंतु हा वाद क्षणिक ठरू नये, तसेच शेतकºयांचे प्रस्ताव अस्विकार करण्यामागच्या कारणांचीही चौकशी व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सारंगखेड्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे़ ग्रामपंचायत कार्यालय परिसर रेड झोन परिसर म्हणून घोषित आहे़ परंतु महसूल विभागातील कर्मचारीच संचारबंदीचे उल्लंघन करतांना दिसून आले़
मंडळधिकारी व तलाठी या दोघांचा वाद झाल्याची माहिती मिळाली असून दोघांना तहसील कार्यालयात बोलवून समज दिले जाणार आहे. टेंभे येथील कोणत्या प्रकरणाबाबत वाद होता याबाबत चौकशी करण्यात येईल .
-डॉ़ मिलींद कुलकर्णी,
तहसीलदार शहादा़