शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोदलपाडा : सातपुडा भागातील अनेक रस्ते, पूल व घाट अतिशय धोकेदायक स्थितीत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : सातपुडा भागातील अनेक रस्ते, पूल व घाट अतिशय धोकेदायक स्थितीत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळलेल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. कुंडी ते होराफळी रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळलेल्या आहेत तर रस्त्यांची दुरवस्था झाली  आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाची मोठी समस्या आहे.पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सर्वत्र रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. मात्र या योजनेंतर्गत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील रस्ते नुसते नावलाच करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. कुंडी ते होराफळी, भराडीपादर ते कुवा तसेच ज्या ठिकाणी घाटाचा रस्ता आहे त्या घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. जागोजागी अनेक ठिकाणी लहान-मोठय़ा दरडी कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. घाटातून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. कधी दरड कोसळून अपघात घडेल याची भीती  वाहनधारकांमध्ये निर्माण झाली         आहे. कुंडी ते होराफळी घाट हा साधारणत: आठ-दहा किलोमीटर अंतर असलेला वळण रस्ता आहे. या मार्गाने अक्कलकुवा, खापर येथून होराफळी, खडकापाणी, तोबीकुवा, वालंबा, निंबीपाटी, डोटकीपाडा, मोरखी, तिनखुण्याकडे जाण्याचा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच भराडीपादर ते कुवा हा 10 किलोमीटर अंतर असलेला रस्ता या घाटातून जातो. हा रस्ता चिखली, कोठली, कटासखाई, मोगरा, ओघाणी, दहेल  याठिकाणी जाण्यासाठी सोयीचा आहे. हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत तयार करण्यात आला आहे. एका ठिकाणी संरक्षण भिंतही कोसळली आहे. काही ठिकाणी माती व दगड रस्त्यावर पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संपूर्ण घाटात कोठेही दिशादर्शक फलक किंवा सुरेक्षेसंदर्भात धोकेदायक स्थितीदर्शक माहिती दर्शक फलक लावण्यात आलेला नाही. तसेच वळणावर संरक्षक गार्डही नसल्याने जीव मुठीत धरून या घाट रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. संबंधित विभागाने सातपुडय़ातील रस्त्यांवर पडलेले दगड व माती  उचलून खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.