शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात दोन ठिकाणी ब्लॅक स्पॅाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

नंदुरबार : जिल्ह्यात असलेले दोन ब्लॅक स्पॅाट उपाययोजना करून नष्ट करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला. यामध्ये ...

नंदुरबार : जिल्ह्यात असलेले दोन ब्लॅक स्पॅाट उपाययोजना करून नष्ट करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला. यामध्ये धुळे-सुरत महामार्गावर लहान कडवान, ता.नवापूर तर नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वावदनजीकचा स्पॅाटचा समावेश आहे.

जिल्ह्यात दोन ठिकाणे ही सर्वात प्रभावी असे अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट असल्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यात नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वावदनजीचा स्पॉट आणि दुसरा धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी ते नवापूर दरम्यान असलेल्या लहान कडवान जवळील स्पॉट हे तीव्र ब्लॅक स्पॉट असल्याचे निश्चित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता. शिवाय अनेकजण जायबंदी देखील झाले होते. आता हे दोन्ही ब्लॅकस्पॉट नष्ट करण्यात आले आहेत.

इतरही ठिकाणे धोकेदायक

जिल्ह्यातील रस्त्यांची लागलेली वाट लक्षात घेता आता जागोजागी ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे चुकवितांना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर सुरक्षेच्या व गती नियंत्रीत करण्यासाठीच्या उपाययोजना नसल्यामुळे अपघात वाढले आहेत.

नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर घोटाणे ते न्याहली दरम्यान हा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नसल्यामुळे दीड वर्षात या आठ ते दहा किलोमिटर दरम्यान अनेक वेळा अपघात झाले आहेत. अशीच स्थिती अक्कलकुवा ते खापर आणि शहादा ते शिरपूर रस्त्यावरील आहे.