भाजप स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:34 AM2019-12-11T11:34:48+5:302019-12-11T11:34:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजप सर्व जागा लढवण्यास सज्ज असून पक्ष स्वबळावर ...

BJP will fight on its own | भाजप स्वबळावर लढणार

भाजप स्वबळावर लढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजप सर्व जागा लढवण्यास सज्ज असून पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी केले़ सिंधी कॉलनीतील गुरुनानक वाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळावा व इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते़
प्रसंगी आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ़ शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, राजेंद्रकुमार गावीत, व्यंकटराव पाटील, जयपालसिंह रावल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ प्रारंभी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार डॉ़ गावीत यांनी सांगितले की, भाजप कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही़ म्हणून स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे़ जिल्ह्यातील गट व गणातून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करुन तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा़ जिल्हा परिषदेत सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागात केंद्राच्या योजना आणून विकास करण्यात येईल, यासाठी सर्वांनी केंद्राच्या योजनांचा प्रसार करावयाचा आहे़
जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी सर्वच गट व गणात उमेदवार देऊन त्यांना विजयी करुन आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगितले़
सर्व ५६ गट आणि ११२ गणात इच्छुक उमेदवारांनी मुलाखती देत निवडणूकीसाठी केलेल्या तयारीचा आढावा सादर केला़ सर्व सहा तालुक्यातील गट व गणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या़

Web Title: BJP will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.