चिंचपाडा-खोकसा रस्त्यावर दुचाकीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:06 IST2019-12-28T12:06:38+5:302019-12-28T12:06:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा -खोकसा रस्त्यावर पाटी शिवारात मोटरसायकलने धडक देऊन जखमी मदत देण्याची कबुली ...

Biking collision on Chinchpada-Khoksa road | चिंचपाडा-खोकसा रस्त्यावर दुचाकीची धडक

चिंचपाडा-खोकसा रस्त्यावर दुचाकीची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा -खोकसा रस्त्यावर पाटी शिवारात मोटरसायकलने धडक देऊन जखमी मदत देण्याची कबुली एकाने दिली होती़ दरमयान जखमीस मदत न करता टाळाटाळ केल्याने विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे़
२ डिसेंबर रोजी हाकडी ता़ धडगाव येथील पाच्या सिकऱ्या पटले (१३) हा बालक चिंचपाडा -खोकसा रस्त्यावर पाटी शिवारात ट्रॅक्टरमध्ये ऊस भरणाºया मजुरांना पाणी देण्याचे काम करत होता़ यावेळी खोकसा येथील भामट्या पांड्या गावीत हा एमएच ३९-जी-६८८१ या मोटारसायकलने भरधावे वेगात येत होता़ यातून दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने त्याने पाच्या पटले यास धडक दिली होती़ जखमीला दवाखान्यातील उपचारांसाठी लागणारा सर्व खर्च द्यायची तयारी दाखवत त्याने जखमीला खर्च देण्यास टाळाटाळ केली होती़ दरम्यान गुरुवारी सिकºया तानाजी पटले यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भामट्या गावीत याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश येलवे करत आहेत़

Web Title: Biking collision on Chinchpada-Khoksa road