शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

शाडू मातीपासून मूर्तीचे प्रशिक्षण देणारी भारती पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना घेऊन गेल्या चार वर्षांपासून शहाद्यातील भारती विनायक पवार ह्या तरुणीने सुमारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना घेऊन गेल्या चार वर्षांपासून शहाद्यातील भारती विनायक पवार ह्या तरुणीने सुमारे एक हजारापेक्षाही अधिक जणांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. विशेषत: त्यातून अनेक जण आता स्वयंरोजगाराकडे वळले असून पर्यावरणपूरकची संकल्पना आता या युवकांना आत्मनिर्भर बनवीत आहे.शहादा येथील भारती पवार ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या. त्या स्वत: कलाकार असून त्यांना मूर्ती बनविणे व इतर आर्टचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीपासून पर्यावरणाची प्रेरणा घेत आणि स्वत:च्या कलेतून मूर्ती निर्मितीची संकल्पना घेत त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जनजागृती सुरू केली. गेल्या चार वर्षांपासून त्या या कार्यात सक्रीय आहेत. विशेषत: शाडू मातीपासून गणपती बनविण्याबाबतचे त्या प्रशिक्षणही घेत आहेत. गेल्या चार वर्षात सुमारे ५० पेक्षा अधिक कार्यशाळा त्यांनी घेतल्या असून त्यातून एक हजारपेक्षाही अधिक जणांना हे प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्येही त्यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक प्रशिक्षण दिले आहे.आपल्या या कलेसंदर्भात भारती पवार यांनी सांगितले की, त्यांनी व्यावसायिक मूर्तीकारांकडून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या घरासाठी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवली. त्यानंतर लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला. काही जणांना याबाबत सांगितले, प्रशिक्षण दिले. पुढे त्याचा प्रतिसाद पाहता स्वतंत्र कार्यशाळा सुरू केली. या कार्यशाळेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक तरुण दरवर्षी शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याचा व्यवसायही करतात. त्यांना त्यातून रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता तरुणांना आत्मनिर्भर करण्याची प्रेरणादेखील या उपक्रमातून मिळाली आहे. गणेश मूर्तीबरोबरच रांगोळी, पेंटींग, कपड्यावरील कला, मेहंदी याचेही प्रशिक्षण देत असून त्यातूनही अनेकांना रोजगार मिळाला आहे.यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने कार्यशाळा आॅनलाईन घेतल्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदादेखील आपल्या संपर्कातील किमान एक हजारपेक्षा अधिक जण शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करणार आहेत. आपणही यावर्षी अनेक मूर्ती साकारली आहेत. यंदा खास करून राम मंदिराचे भूमिपूजन ही ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे श्रीरामाच्या अवतारातील गणेश मूर्ती बनवली आहे. याशिवाय बालगणेश, शंकर पिंड आदी विविध आकारातील गणेश मूर्ती साकारल्या आहेत.-भारती पवार,मूर्तीकार, शहादा.