शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

मोरखींकडून मानता सोडण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चंद्र व सुर्यावरुन होणाऱ्या पपारंपरिक कालगणनेनुसार माघ अमावास्येच्या आधी होळीसाठी व्रत पाळणाºया मोरखींनी दुधाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चंद्र व सुर्यावरुन होणाऱ्या पपारंपरिक कालगणनेनुसार माघ अमावास्येच्या आधी होळीसाठी व्रत पाळणाºया मोरखींनी दुधाने पवित्र स्नान करीत मानतेला सुरुवात केली होती. होळींची नियोजित संख्या पूर्ण केल्यानंतर काही मोरखींनी त्यांचा सामान तथा मानता सोडण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्त अखेरची पूजाविधी व पुन्हा दुधानेच स्रान करीत आहे.आदिवासी जमातीत आजही चंद्र व सुर्यावरुन कालगणना होत आहे. यंदाच्या होळीसाठी देवमोगरा यात्रेपासूनच गणना सुरू झाली, त्यानुसार सातपुड्यातील व्रत पाळणाºया मोरखी यांनी माघ अमावास्येला होळीसाठी दुधाने पवित्र स्रान केली होती. अमावास्येनंतर येणारा चंद्रकोर (अमावास्येनंतर पहिल्या दिवशी येणारा चंद्राचा भाग) याचे दर्शन घेत मानता तथा व्रत पाळण्यास सुरुवात केली होती. व्रत पाळणाऱ्यांमध्ये मोरपीस व मोठ्या पितळी घुंगरुवाला मोरखी, बांबूपासून निर्मिती टोप व दुधी भोपळे कमरेला बांधणारा बावा-बुद्या, हातात बांबूची सुपडी व लाकडी चमचा बाळगणारा काली, धनुष्यबाण बाळगणारा मोरावाला व लाकडी घोडावाला यांचा समावेश आहे. या सर्वांना होळीची ठराविक संख्या पूर्ण करावीच लागते, ही संख्या पूर्ण करण्यासाठी जवळपासच्या गावांमधील होळीत सहभागी होऊन तेथील होळीचे दर्शन घेणे आवश्यक असते. त्यानुसारच होळीला सुरुवात झाल्यापासून बहुतांश मोरखी यांनी त्यांची संख्या पूर्ण केली आहे. त्यामुळे या मोरखींकडून होळीची मानता तथा व्रत सुटण्यास सुरुवात झाली आहे.मानतासाठी मोरखींचे संपूर्ण सामान, कपडे, अंथरुण-पांघरुणच्या चादरी व अन्य साहित्यही दुधाचा शिडकावा देत ती धुतली गेली होती. या साहित्याला अन्य कोणीही हात लावू शकत नाही. त्यामुळे हे सर्व साहित्य या मोरखींना निर्जन ठिकाणीच अलिप्त ठेवली होती. या साहित्यांसह होळीची संख्या पूर्ण करणारे मोरखी हे त्यांच्या ठराविक पुजारी यांच्याकडून अखेरची पूजाविधी करुन घेत आहे. ही पूजाविधी नेहमी नदीकाठावरच करावी लागत असल्याने सातपुड्यातील बहुतांश नदीकाठावर अखेरची पुजाविधी करणाºयांची संख्या वाढली आहे. या मोरखींकडून पुजाविधीनंतर पुन्हा दुधानेच पवित्र स्रान केली जात आहे.सातपुड्यात होळीचा समारोप झाला नसला तरी या बहुतांश मोरखींकडून सामान सोडविण्यात येत आहे. सामान सोडवत न संपलेल्या होळीसाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच तेही सहभागी होत आहे.