शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांना रोजगार हमीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्तरावर रोजगार नसल्याने दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक मजूर परराज्यात हंगामी स्थलांतरित होतात. दरवर्षी साधारणत: दिवाळीनंतर मजुरांचे ...

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्तरावर रोजगार नसल्याने दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक मजूर परराज्यात हंगामी स्थलांतरित होतात. दरवर्षी साधारणत: दिवाळीनंतर मजुरांचे स्थलांतर सुरू होते आणि एप्रिल-मेमध्ये हे मजूर आपल्या मूळगावी परततात. लॉकडाऊनमुळे देशभरातील व्यापार, व्यवसाय, उद्योग ठप्प झाल्याने जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले मजूरही गेल्यावर्षी महिना दोन महिने अगोदरच मूळगावी परतले. त्यासाठी त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. सुरुवातीला प्रशासनाने परवानगी नाकारली, नंतर प्रशासन मेहरबान झाले आणि रोजगार हमीची कामे सुरू केली. सुरुवातीच्या काळात मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. त्यामुळे गावी परतलेल्या मजुरांचा उदरनिर्वाहाची चिंता दूर झाली होती. रोहयोच्या कामांवर रोज २५ हजारांपासून ते ६५ हजारांपर्यंत मजुरांची संख्या गेली होती. गेल्या २० वर्षांत एकाच दिवशी सर्वाधिक मजूर रोहयोच्या कामांवर उपस्थित राहण्याचा विक्रम गेल्यावर्षीच झाला. त्यामुळे रोजगार हमी योजना स्थलांतरित मजुरांसाठी फायदेशीर ठरली.

गेल्या वर्षभरात रोहयोमुळे एक लाख दोन हजार ९४१ कुटुंबांना रोजगार मिळाला, तर त्यांना ८३ कोटी रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळाली. रोहयोअंतर्गत सीसीटी, एलबीएस, कंपार्टमेंट बंड, गट लागवड, गाळ काढणे, गोठा, घरकूल, नाडेप, फळबाग, मजगी, माती नाला बांध, रस्ता दुतर्फा वृक्षलागवड, रस्ता काम, राजीव गांधी भवन, अंगणवाडी इमारत बांधणे, रोपवाटिका, वर्मी कंपोस्ट, विहीर पुनर्भरण, वृक्षलागवड, विहीर खोदणे, शेततळे, शौचालय, शोषखड्डे आदी विविध स्वरूपाची कामे उपलब्ध करून देण्यात आली.

तालुकानिहाय चित्र पाहिल्यास अक्कलकुवा तालुक्यात १० हजार ३७१ कामे, अक्राणी तालुक्यात आठ हजार २५०, नंदुरबार तालुक्यात चार हजार ६५, नवापूर तालुक्यात सात हजार २५, शहादा तालुक्यात सहा हजार ९३२ आणि तळोदा तालुक्यात तीन हजार ८२४ अशी एकूण ४० हजार ३३७ कामे मजुरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या कामांवर जवळपास ८३ कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे.

अर्थात ऑक्टोबरनंतर मात्र रोहयोच्या कामांवरील मजूर संख्या कमी होऊ लागली. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने बहुतांश मजूर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे सद्य:स्थितीत रोहयोच्या कामांवरील मजुरांची संख्या दहा हजारांवर आली आहे.