शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांचे आधार ठरतेय तळोद्यातील अन्न छत्र परिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीने जनमनावर अक्षरश: दहशत पसरविली असून, नुसते त्याचे नाव काढले तरी मनाचा थरकाप ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीने जनमनावर अक्षरश: दहशत पसरविली असून, नुसते त्याचे नाव काढले तरी मनाचा थरकाप होतो. मात्र अशा भयानक परिस्थितीत ही तळोद्यातील अन्नछत्र परिवारातील शिलेदार आपल्या जीवाची बाजी लावत शहरातील रंजल्या गांजल्यांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या या मदतीमुळे तरी निदान कुटुंबाची एकवेळची पोटाची खळगी भरली जात आहे. तरूणांच्या या कामाचे समाजातून कौतुक केले जात आहे.कोरोना या महामारीने संपूर्ण जगात अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे त्याचा अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात लागू केला आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अगदी हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांनाच त्यांची अधिक झळ बसत आहे. कारण कामेच ठप्प झाल्यामुळे ते कामावरही जावू शकत नाही. परिणामी कामधंद्याअभावी रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन पोटाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात शासनाबरोबरच, सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून अशा कुटुंबांना मदतीचा ओघ होत असला तरी ही, मदत संबंधित कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी संतोष माळी व पूतन दुबे हे तरूण महामारीची तमा न बाळगता जीवाचे रान करत मेहनत घेत आहेत. सकाळी लवकर उठून एकाठिकाणी बसून दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करतात. दानशूर व्यक्ती, संस्थांकडून मिळालेले गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक वस्तु त्यांच्या घरी जावून आणणे व एका गोडावूनमध्ये त्याची पिशवीत समप्रमाणात पॅकींग करून प्रत्यक्ष गरीब कुटुंबांना घरपोच देतात.शहरातील साधारण पावणे चारशे गरीब कुटुंबांना मदत होत आहे. यासाठी तरूणांनी ‘अन्न छत्र परिवार’ असा ग्रुप स्थापन करून मदतीचे आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनास शहरातील दात्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात. रस्त्यावरील बेघर असलेल्यांनादेखील ते शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ जागेवरच मिळवून देत आहेत. अशा ४० भुकेल्यांची पोटाची खळगी भरली जात आहे.आमलाड वसतीगृहातील विलगीकरण कक्षातदेखील ते रूग्णांना पिण्याचे फिल्टर पाणी उपलब्ध करून देत आहे. वास्तविक कोरोनाच्या महामारीने संपूर्ण समाजावर भितीचे वातावरण आहे. अशा भयानक वातावरणात कुणीही अस काम करण्यास धजावत नाही. मात्र या दोन्ही शिलेदारांनी सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून आणिबाणीच्या परिस्थितीत दिन दुबळ्यांची सेवा करण्याचा निर्धार केला आहे. त्याचे हे प्रामाणिक कार्य पाहून प्रशासनानेदेखील त्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोघ तरूण नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. महामारीच्या अशा कठिण परिस्थितीत जीवनावश्यक व अन्न मिळत असल्याने शहरातील गरीब कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.कोरोना या महामारीची हातावर पोट भरणाºया कुटुंना मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. कामधंद्या अथवा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही दोघं मित्रांनी सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर मदतीचा ओघदेखील मोठ्या प्रमाणात वाढला. त्यांनी दिलेल्या मालाचे योग्य नियोजन करून अशा गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष घर पोहोच करत आहोत. प्रशासनाचेदेखील आम्हाला मार्गदर्शन व मदत मिळत आहे. गरीब कुटुंबांना शासनाबरोबरच दानशूरांची मदत मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करतात.-संतोष माळी, तळोदा