शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या लाॅकडॉऊनमुळे बळिराजा आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत ...

खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊन काळात वाहतूक तसेच इतर मोठ्या शहरात व्यवहार बंद असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास कचरत आहे. त्यामुळे या हंगामात घरी आलेला माल शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खेडा खरेदीतसुद्धा शेतकरी लुबाडला जात आहे

सद्य:स्थितीत शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून, त्यासाठी लागणारी मजुरांची मजुरी अथवा यंत्राचे भाडे देण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्याकडेच आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे जगण्याचे मोठे हाल होत आहे.

शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने केल्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरला नाही. तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्‍टरचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चारा टंचाई

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामापूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी प्रशासनाने कृषीविषयक दुकानाची वेळ वाढवून दिली आहे. मात्र, संचार बंदीमुळे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खतेही महागण्याचे चित्र आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे.