शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

बोलीभाषेतील लोकगीते व काव्यातून कोरोनाची जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:55 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी स्थानिक ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी स्थानिक कवींनीही पुढाकार घेतला असून आपल्या बोलीभाषेतील कविता आणि गीतांमधून लोकजागृती होत आहे. विशेषत: सोशल मिडीयातून त्याचा प्रसार केला जात असून जनमानसातून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.जिल्ह्यात विशेषत: आदिवासी, गुजर आणि अहिराणी भाषिक समाजाची संख्या अधिक आहे. त्यामुळे याच भाषेतून कविता व साहित्याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला असून साहित्यिक व कवीही पुढे सरसावले आहेत. अनेक रसिकांनी संत आणि नामांकीत कवींच्या कविता आणि राष्टÑभक्ती गीतेही या काळात लोकांपर्यंत पोहोचवून कोरोनाच्या जागृतीचा संदेश देत आहेत. त्यात विशेषत: विं.दा. करंदीकरांची ‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा...’ ही कविता सध्या सोशल मिडियात अधिक लोकप्रिय ठरली आहे.खास करून खटवाणी, ता.अक्कलकुवा येथील बानूबाई जिऱ्या वसावे यांनी आदिवासी भाषेतील तयार केलेले कोरोना लोकजागृतीचे गीत अधिकच लक्षवेधी ठरले आहे. ‘जा जा कोरोना बिमारी दूर रेहेजे भाऊ...’ या गीताची व्हीडीओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या गीतातून त्यांनी ‘तुम्ही सारे भाऊ-बहीण समजून घ्या व कोरोनावर उपाययोजना करा, हात धुवा, एकमेकांमधील अंतर ठेवा, गरम पाणी प्या, तोंडावर कपडा बांधा, आजारी असाल तर डॉक्टरांकडे जा’ असे विविध संदेश आपल्या खास बोलीभाषेतील लोकगीतातून दिला आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या त्या कार्यकर्त्या असून त्यांच्यासोबत सुमित्रा वसावे व इतर कार्यकर्तेही आदिवासी बोलीभाषेतून प्रबोधन करीत आहेत.त्याचबरोबर अहिराणी भाषेतूनही जनजागृती होत आहे. त्यात शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांची व्हीडीओ क्लीप लक्षवेधी ठरली आहे. अहिराणी भाषेतून त्यांनी जागृतीचे संदेश दिले आहेत. यासह स्थानिक कवींनीही विविध कविता आणि चारोळ्यातून त्याबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.गुजर भाषेतील कवी मोहन पाटील यांनी ‘जीवन छे अनमोल भाई, कोरोना करेछे कहर...’ या कवितेतून तसेच कवी जगन्नाथ पाटील यांनी ‘नो कोरोना-नो परोना, नई जोडेना-नयी कोरेना...’ अशा कवितांतून जनजागृती करण्याबाबत प्रयत्न केला आहे. या कवितांना सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.