शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील खाजगी दवाखाने सील करणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात इतर रुग्ण उपचार घेत असताना त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात इतर रुग्ण उपचार घेत असताना त्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय १४ दिवस सील करू नये अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे़ जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले आहे़
निवेदनात, कोरोनामुळे प्रचंड भीतीचे वातावरण असताना देखील नंदुरबार जिल्ह्यातील खासगी डॉक्टर त्यांच्या रुग्णालयांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत़ यामुळे शासकीय रुग्णालयाच्या ताण कमी झाला आहे़ ज्या पद्धतीने शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका सफाई कामगार व पोलीस प्रशासन कोरोनाविरोधातील युद्धात सहभागी झाले आहेत़ त्याचप्रकारे खाजगी डॉक्टर देखील या लढ्यात सामील आहेत़ परंतू एखाद्या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय १४ दिवस सील करण्यात येते़ तसे न करता केवळ ४८ तास पूर्ण हॉस्पिटल निजंर्तूक करून पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण रुग्णालय सील करण्याची आवश्यकता अथवा त्या परिसरातील कार्यालय दुकाने बंद करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे़ दवाखाने सील केल्यामुळे दाखल रुग्णांचे हाल व डॉक्टरांचे खच्चीकरण होत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे़
यावेळी जिल्हाध्यक्ष चौधरी यांच्यासह देव मोगरा एज्युकेशन संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चाचेहर्षल पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डा़ॅ़ मनोज तांबोळी उपस्थित होते.