मेडिकल कॅालेजच्या अंतिम मंजुरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:50 IST2020-10-16T12:50:23+5:302020-10-16T12:50:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्थात नीट परीक्षेचा निकाल जाहीर होत असतांना देखील ...

मेडिकल कॅालेजच्या अंतिम मंजुरीकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्थात नीट परीक्षेचा निकाल जाहीर होत असतांना देखील नंदुरबारच्या मेडिकल कॅालेजच्या अंतीम मंजूरीसंदर्भात अद्याप काहीही हालचाल नसल्याची स्थिती आहे. कॅालेेज सुरू करण्यासंदर्भात सर्व तयारी झालेली असतांना केवळ एका परवाणगीसाठी सर्व अडून बसलेले आहे.
नंदुरबार मेडिकल कॅालेजला आवश्यक त्या सर्व परवाणग्या मिळालेल्या आहेत. केंद्र शासनाचा हिश्याचा निधी देखील मंजूर झालेला आहे. आजच कॅालेज सुरू होईल या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. परंतु केवळ केंद्राच्या अंतिम मंजुरीत हे कॅालेज अडकले आहे. शुक्रवारी नीट परीक्षेचा निकाल जाहीर होत असल्यामुळे प्रवेश प्रकिया देखील लागलीच सुरू होणार आहे. कॅालेज आताच सुरू झाले नाही तर पुन्हा वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
महिनाभरापूर्वी आली समिती
नंदुरबार मेडिकल कॅालेजच्या अंतिम मंजूरीसाठी केंद्राची समिती महिनाभरापूर्वी दाखल झाली होती. समितीन आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळणी केली. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक ते विभाग, इमारत, प्राध्यापकांची नियुक्ती, साधन सामुग्री आणि इतर इन्फास्ट्रक्चर पाहून समितीने समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे लागलीच अर्थात महिनाभराच्या आत अंतिम परवाणगी मिळेल अशी अपेक्षा लागून होती. परंतु समितीने अद्यापही आपल्या अहवालानुसार मंजुरीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे चित्र आहे.
१०० विद्यार्थ्यांना प्रवेश
पहिल्या वर्षी अर्थात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी अर्थातच राज्यावरून प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. कॅालेजला मंजुरी मिळाल्यास राज्यातील एमबीबीएसच्या प्रवेशाच्या जागा देखील वाढणार असल्याचे स्पष्टच आहे. त्यामुळे राज्य शासनाने देखील याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून यंदा कॅालेज सुरू कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एका परवानगी अभावी अडकले कॅालेज...
नंदुरबार मेडिकल कॅालेजला गेल्या दहा वर्षांपूर्वी परवानगी मिळाली होती. परंतु त्यावेळी आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर भाजप शासनाने पुन्हा कॅालेजची घोषणा केली. परंतु पाच वर्ष झाले अद्याप ते सुरू होऊ शकले नाही. आताच्या स्थितीत कॅालेज सुरू होऊ शकेल अशी स्थिती आहे. परंतु अंतिम मंजुरीच्या कचाट्यात ते अडकले आहे. केवळ एका परवानगीने आजच या कॅालेजमध्ये प्रवेश प्रक्रीया राबविण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा हे कॅालेज कुठल्याही परिस्थीत सुरू व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.