शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची दुचाकी विक्रीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीची दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास एलसीबीच्या पथकाने नंदुरबारातील नवापूर चौफुलीवर पकडले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरीची दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास एलसीबीच्या पथकाने नंदुरबारातील नवापूर चौफुलीवर पकडले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.गोरख राजेंद्र ठाकरे, रा.पाटीलपाडा, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. शहरातील नवापूर चौफुली भागात एकजण नवी दुचाकी कमी किंमतीत विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यांनी लागलीच गस्तीवर असलेल्या पथकाला नवापूर चौफुली भागात पाठविले. माहिती मिळालेल्या व्यक्तीच्या वर्णनाशी मिळताजुळता वर्णन असलेली व्यक्ती या भागात फिरतांना आढळली. त्याच्याकडे पल्सर दुचाकी होती. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याने माहिती दिली.दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारातून ही दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केले. घटना जुनी झाल्याने आता ही दुचाकी आपण विक्रीसाठी काढली होती. जेवढी किंमत येईल तेवढी घेवून दुचाकीची विल्हेवाट लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याला ताब्यात घेवून शहर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याकडून चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार संजय वाघ, प्रमोद सोनवणे, बापू बागुल, दादाभाई मासुळे, राकेश मोरे, मनोज नाईक, किरण मोरे, राजेंद्र काटके, अभय राजपूत, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.दरम्यान, जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. महिन्याला सरासरी दिवसाआड एक दुचाकी चोरी होण्याची घटना जिल्ह्यात घडत आहे. यामुळे दुचाकी मालक मोठ्या प्रमाणावर हैराण झाले होते. एकाच शहरात किंवा एकाच भागात चोरीच्या घटना होण्याऐवजी संपुर्ण जिल्ह्यात आणि ग्रामिण भागात देखील या घटना घडत असल्यामुळे चोरट्यांचे जाळे किती आणि कसे विस्तारले आहे याबाबत चर्चा होत होती. १५ दिवसांपूर्वी एलसीबीने सातपुड्याच्या दुर्गम भागात एकाला चोरीच्या १८ दुचाकीसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर चोरीच्या घटना उघडकीस येवू लागल्या आहेत.