शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

दर्जान्नोतीसाठी आश्रमशाळांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छतेबाबत खालावेल्या दर्जामुळे चर्चेत असलेल्या ११ आश्रमशाळांचा कायपालट करण्याची किमया नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छतेबाबत खालावेल्या दर्जामुळे चर्चेत असलेल्या ११ आश्रमशाळांचा कायपालट करण्याची किमया नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अवघ्या १५ दिवसात करुन दाखवली आहे़ प्रकल्प कार्यालयाने स्वच्छतेसाठी घेतलेल्या या स्पर्धेत तीन शाळांना पुरस्कृत करुन प्रोत्साहन देण्यात येणार आहे़आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील अस्वच्छता, बेशिस्ती, खालावलेली शैक्षणिक गुणवत्ता याबाबत सातत्याने ओरड होत आहे़ प्रकल्प कार्यालयांनी सातत्याने कारवाई करुनही कामकाज सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे़ यावर मार्ग म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी वसुमना पंत यांनी गेल्या महिन्यात ‘दर्जान्नोती’साठी ११ आश्रमशाळांची निवड करुन त्यांच्यात स्पर्धा होणार असल्याचे कळवले होते़ प्रथम तीन शाळांना रोख बक्षिसे आणि पारितोषिक देण्याची घोषणा त्यांनी केली होती़ त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत १५ जानेवारीपासून सुरु झालेल्या स्पर्धेत सर्व ११ आश्रमशाळांनी हिरीरीने सहभाग घेत आश्रमशाळांचा कायापालट केल्याचे चित्र दिसून येत आहे़ विद्यार्थी, शिक्षक आणि आश्रमीय कर्मचारी यांच्या सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेमुळे नंदुरबार प्रकल्पातील सर्वाधिक वाईट या यादीतील आश्रमशाळा थेट सर्वाधिक चांगल्या यादीत आल्या आहेत़ विशेष म्हणजे या उपक्रमासाठी खूप सारा शासकीय निधी खर्च न करता प्रथमच आश्रमशाळा प्रशासनाने श्रमदान करुन कामकाज केल्याने त्यांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे़आश्रमशाळांनी १५ दिवसात राबवलेल्या विविध कामांची माहिती घेण्यासाठी ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन पडताळणी करण्यात आली होती़ अधिकाऱ्यांनी त्या-त्या आश्रमशाळांना भेटी देत गुणदान करुन अहवाल प्रकल्पाधिकारी यांना सोपवला आहे़ येत्या १५ फेब्रुवारीनंतर या स्पर्धेचा निकाल घोषित होण्याची शक्यता असून मुख्याध्यापक व शाळा प्रशासनानांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आहे़नंदुरबार प्रकल्पांतर्गत शहादा तालुक्यातील चिरखान, चांदसैली, मलगाव, नवलपूर, राणीपूर आणि गणोर येथील शासकीय आश्रमशाळा, नवापुर तालुक्यातील निजामपूर, बंधारे, खेकडा, वडकळंबी तर नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे, भालेर येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये हा प्रकल्प राबण्यात आला आहे़ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ११ आश्रमशाळांसाठी १०० गुणांचे निकष लावण्यात आले होते़ त्यानुसार शाळांनी पूर्ण केलेल्या उपक्रमांची पाहणी सहायक प्रकल्पाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाºयांनी केली़ नंदुरबार तालुक्यात सहायक प्रकल्प अधिकारी पी़बी देसाई, जिजाबाई पाडवी, नवापुर तालुक्यात शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, यु़एल़बेडसे तर शहादा तालुक्यात सहायक प्रकल्पाधिकारी एस़एनक़ाकडे यांनी भेटी दिल्या होत्या़ सर्व ११ आश्रमशाळांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करुन त्या निकषानुसार गुणदान देत अहवाल प्रकल्पाधिकाºयांना दिला आहे़उपक्रमांतर्गत विद्यार्थी सहभागासाठी १० गुण देण्यात आले होते़ यात गणवेश, शिस्तपालन, वर्गसजावट, वसतीगृह, शाळा, वर्गखोल्या स्वच्छता, विद्यार्थी रॅली, आरोग्य, जनजागृती, शैक्षणिक गुणवत्ता आदी १० निकषांचा समावेश होता़४कर्मचारी सहभाग यांतर्गत १० गुण देण्यात आले़ शाळेचे नियोजन, वेळ, कामकाज, विद्यार्थ्यांची तपासणी, पालकांसोबत संवाद, ज्यादा तासिकांचे नियोजन, विद्यार्थी गुणवत्तासाठी प्रयत्न आदी मुद्दे होते़शालेय इमारत व परिसरासाठी गुणदान करण्यात आले होते़ यात विद्युत कनेक्शन, सुरक्षिता, पुरेशा खोल्या, स्वच्छता, मांडणी, वृक्षसंवर्धन, क्रीडांगण आदी मुद्द्यांना गुण देण्यात आले़स्पर्धेंतर्गत सोयी सुविधा व टापटीप याचेही परीक्षण करण्यात आले़ यात मुख्याध्यापक कक्ष, शिक्षकांचे दालन, पिण्याचे शुद्ध पाणी, वाचन कट्टा, स्वच्छ परिसर, पारंपरिक नियोजन, भोजन व्यवस्था, पुरेसे आणि चवदार भोजन यांचे परीक्षण करण्यात आले़विद्यार्थ्यांच्या सहभागाने उपयोगी परसबागेची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली होती़ त्याची माहिती अधिकाºयांनी घेतली़पाण्याची सोय, मुबलकता, स्वच्छतागृह, स्रानगृह आणि स्वच्छता यांचाही आढावा घेण्यात आला़वसतीगृह व्यवस्थापन, स्वच्छता टापटीप याचीही पाहणी पथकांनी केली़या उपक्रमांतर्गत शालेय अभिलेखे, दस्तावेज, मांडणी यांची पाहणी करण्यात आली़ बहुतांश आश्रमशाळांमध्ये कपाट, खुर्च्या, टेबल यांची सोय असली तरीही त्यांची निगा घेतली जात नसल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते़ यामाध्यमातून त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता झाली़तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, दाखले, गुणपत्रके, मासिक सभा, इतिवृत्त यांचीही माहिती आश्रमशाळांनी नेटकी करुन सादर केल्याने पुढील अडचणी दूर झाल्या आहेत़