शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

न्याय हक्कासाठी आलेल्या ‘आशा’ आंदोलकांचे पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणा:या आशा कर्मचारींना आंदोलनादरम्यान पाणीच न मिळाल्याने त्यांचे हाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणा:या आशा कर्मचारींना आंदोलनादरम्यान पाणीच न मिळाल्याने त्यांचे हाल झाल़े या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या पाणीबाणीचा प्रकार उजेडात आला आह़े     महिनाभरापासून सणउत्सवांमुळे सुटय़ांचा हंगाम असल्याने जिल्हा प्रशासनाचे कामकाज संथावले होत़े मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर येथे सकाळपासून निवेदनासह समस्या मांडणा:यांचे जत्थे दाखल झाले होत़े सोमवारचा लोकशाही दिन  मंगळवारी आयोजित करण्यात आला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा शाखेकडून कार्यालयसमोर आंदोलन पुकारण्यात आले होत़े यामुळे आतील भागासह बाहेरही गर्दी झाली होती़  मोठय़ा संख्येने आलेल्या नागरिकांना दिवसभरात पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती़ विद्याथ्र्यासह, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही नाराजी बोलून दाखवली़ कार्यालयाच्या इमारतीतील चार वॉटर कुलर बंद असल्याने आशा स्वयंसेविका आणि त्यांनी सोबत आणलेल्या बालकांचे सर्वाधिक हाल झाले होत़े गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कार्यालयातील या पाणीबाणीबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती देण्यात आली आह़े  जिल्ह्यात पाणीटंचाईसाठी कोटय़ावधी रुपये मंजूर करणा:या प्रशासनाकडून कार्यालयाच्या इमारतीमध्ये काम करणारे व भेटी देणा:यांसाठी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने आश्चर्यही व्यक्त होत आह़े विशेष म्हणजे प्रशासनाने कर्मचा:यांच्या सोयीसाठी पाणीखरेदी गेल्या काही वर्षापासून सुरु केली आह़े यामुळे वॉटरकुलरकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आह़े येत्या काळात निवडणूकांमुळे येथे गर्दी वाढणार असल्याने प्रशासनाने पाण्याची सोय करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े  

टोकरतलाव रस्त्यावर उभारण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कूपनलिका करण्यात आली होती़ यातून कार्यालयातील स्वच्छतागृह, वॉटर प्युरीफायर आणि वॉटरकुलर यात पाणी पुरवठा करण्यात येतो़ कार्यालयातील दोन मजल्यांवर दोन्ही टोकाला चार वॉटर कूलर लावण्यात आले होत़े यातून येथे येणा:या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत होत़े परंतू गेल्या वर्षभरापासून हे चारही कूलर बंदावस्थेत पडून आहेत़ यावर मात करत प्रशासनाने कार्यालयीन कर्मचा:यांसाठी पाणी खरेदी करण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरु आह़े शहरापासून लांब असलेल्या या कार्यालयापासून लांब अंतरावरील नवापुर चौफुलीर्पयत विकतचे पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आह़े अंध, अपंग, लहान बालके, विद्यार्थी हे आतील कँटीनर्पयत जाण्यात असमर्थ ठरत आहेत़ याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आह़े एकीकडे पाण्याची समस्या असताना दुसरीकडे स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याचे समोर आले आह़े यामुळे महिला आणि पुरुष कर्मचारी सर्वाधिक त्रस्त आहेत़ 

मंगळवार हा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांचा वार ठरला़ तब्बल 12 नागरिकांच्या गटांनी समस्या निवेदनाद्वारे मांडून दाद मागितली आह़े यात वाल्मिक ऋषी महेत्तर समाज सकंल पंच सर्वागिण विकास समिती, जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना, अक्कलकुवा येथील विद्यार्थी यांच्यासह इतर नागरी गटांचा समावेश आह़े या सर्वाचे निवेदन स्विकारले गेले असले तरी पाण्यासह इतर समस्यांवर त्यांनी बोट ठेवले होत़े