ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 13 - शहरातील बाजारपेठेत गेल्या आठ दिवसात परराज्यातून मोठय़ा प्रमाणावर आंब्यांची आवक झाली आह़े यात कच्च्या स्वरूपातील कै:यांना गोडवा देण्यासाठी ‘कारपेट’ वापरण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत़
नंदुरबार शहरात अक्षय्यतृतीयपासून बाजारात आंब्यांची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू झाली आह़े गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या भागातून आणल्या गेलेला हा माल कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्याला परिपक्व करण्यासाठी विविध रसायनांचा वापर होत आह़े काही ठिकाणी ‘कारपेट’ या रसायनाचा वापर होत असल्याची माहिती देण्यात येत आह़े शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या या रसायनामुळे अनेक आजार जडण्याची भिती आह़े याबाबत शहरातील ठोक व किरकोळ आंबा व्यापा:यांमध्येही जनजागृती नसल्याने हे प्रकार वाढत आहेत़
नंदुरबार शहरात सुरू असलेल्या या प्रकारांची योग्य ती पडताळणी करून अन्न व औषध प्रशासनाने योग्य ती कारवाई केल्यास समस्या निकाली निघणार आह़े सध्या नागरिकांकडून बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या विविध प्रकारच्या आंब्यांना पसंती देण्यात येत आह़े वर्षातून एकदाच येणा:या फळाचा गोडवा चाखताना त्यातून कोणत्याही प्रकारचा अपाय होऊ नये अशी त्यांची अपेक्षा आह़े
वर्षभरात एकही कारवाई नाही
नागरिंकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींबाबत नंदुरबार येथील अन्न व अनौषध प्रशासनाचे निरीक्षक निखील कुळकर्णी यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, प्रशासनाकडे अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी नाहीत़ यामुळे कारवाई होऊ शकलेली नाही़ नागरिकांनी तक्रारी दिल्यास कारवाई करू, जिल्ह्यात कारपेटने पिकवलेले आंबे विक्री होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आह़े
नंदुरबार येथे अन्न आणि औषध प्रशासनाचे जिल्हा कार्यालय नसल्याने नागरिक तक्रार करतील कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आह़े या कार्यालयाचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे, जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आह़े विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने एकही कारवाई केलेली नसल्याची माहिती आह़े
कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांची डोकेदुखी
By admin | Updated: May 13, 2017 16:26 IST
गेल्या आठ दिवसात परराज्यातून मोठय़ा प्रमाणावर आंब्यांची आवक झाली आह़े
कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांची डोकेदुखी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}