शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
2
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
3
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
4
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
5
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
6
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
7
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
8
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
9
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
11
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
12
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
13
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
14
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
15
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
16
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
17
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
18
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
19
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या युवकाने तयार केले कोरोनाची लक्षणे सांगणारे अ‍ॅप व कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंजिनियर असलेल्या युवकाने लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत कोरोनाची लक्षणे शोधून माहिती देणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील इंजिनियर असलेल्या युवकाने लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत कोरोनाची लक्षणे शोधून माहिती देणारे मोबाईल अ‍ॅप आणि कीट तयार केले आहे़ अत्यल्प खर्चात तयार केलेले कीट आणि अ‍ॅप शरीरातील आॅक्सिजन व इतर घटकांची मात्रा सांगून कोरोनाचा अलर्ट देणार आहे़
योगेश अहिरे या उद्यमी युवकाने हे अ‍ॅप आणि कीट डेव्हलप केले असून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या योगेश याने शहरात स्टार्ट अप अंतर्गत पहिला बीपीओही सुरू केला आहे़ यांतर्गत अनेकांना रोजगार मिळवून दिला असताना ग्रामीण भागातील युवकांना आॅनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या मोबाईलच्या डेव्हलपिंग तो काम करत आहे़ दरम्यान मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर योगेश अहिरे याने कोरोनाची लक्षणे सोप्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी समोर येतील यासाठी एखादे अ‍ॅप डेव्हलप करण्याचे निश्चित केले होते़ त्यावर करत असताना त्याला आयएम हेल्दी हे अ‍ॅप आणि कीटची संकल्पना सुचली़ आॅक्सिमिटर आणि फिव्हर यांची माहिती देणाºया दोन यंत्रांचे एकत्रित मॉडेल तयार करुन त्याची माहिती वापरकर्त्याच्या मोबाईलवर देण्याचा अनोखा प्रयोग त्याने यशस्वी करत हे कीट बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ आॅगस्ट महिन्यात हे कीट बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती योगेश याने पत्रकार परिषदेत दिली आहे़
यावेळी त्याने सांगितले की, या कीटच्या बनावटीचा कारखाना नंदुरबारात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे़ अल्प खर्चात तयार केलेल्या कीटमध्ये ५ व्होल्टचे चार्जर, दोन बॅटरी लावण्यात आली असून युव्ही लाईट चीपमुळे एकाने थंब केल्यावर त्याला सॅनेटाईज करण्याची गरज भासणार नाही़ एखाद्याकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्यास अ‍ॅडमिन असलेल्या व्यक्तीच्या मोबाईमध्ये शरीरातील विविध रिडिंग्स देण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे़

बायोमेट्रिक थंब मशिनप्रमाणेच असलेल्या या कीटमधील मशिनवर बोट ठेवल्यानंतर शरीरातील ताप, रक्तदाब, आॅक्सिजनचे प्रमाण याची माहिती मिळणार आहे़ ही माहिती मोबाईलमध्ये संकलित होवून ती आरोग्य विभाग किंवा फॅमिली डॉक्टरपर्यंतही पोहोचणार आहे़
या डेमो मॉडेलचे सादरीकरण योगेश अहिरे याने जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले होते़
तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचे कॉपीराईट तर कीटला आयसीएमआर या संस्थेने नॉर्मल मेडिकल डिव्हाईस म्हणून मान्यता आहे़ आॅक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंगप्रमाणेच हे काम करणार आहे़ शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यासह गर्दीच्या ठिकाणी हे कीट व अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे़