शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत उमेदवारांना सतावतेय चिंता ऑनलाईन खर्च सादर करण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आधी निवडणूक अर्ज व इतर कागदपत्र ॲानलाईन सादर करतांना अनेक अडचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आधी निवडणूक अर्ज व इतर कागदपत्र ॲानलाईन सादर करतांना अनेक अडचणी आल्या. आता निवडून आल्यानंतर उमेदवारांना ॲानलाईन खर्च सादर करण्याची मोठी डोकेदुखी वाढली आहे.  ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गेल्या आठड्यात लागला. निवडून आलेल्या उमेदवारांनी गावात, समाजात, नातेवाईक तसेच मित्रपरिवारात जल्लोष केला. आता उमेदवारांना ॲानलाईन खर्च सादर करण्यासाची डोकेदुखी वाढली आहे. ही किचकट बाब निवडून आलेल्या उमेदवारांना जिकरीची ठरत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही तसेच आयोगाचे हे ॲप नवीन वर्जनच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे. उमेदवार सातवी पास असले तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही.  खर्च कसा सादर करायचा या विवंचनेत आहेत.

एक हजार २२९ उमेदवारांनी केली होती उमेदवारी, निवडून आले ५३०या निवडणूकीत एकूण १ हजार २२९ उमेदवारांनी उमेदवारी केली आहे. यातील ५३० सदस्य निवडून आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा अधिक असलेल्या या उमेदवारांनी ॲप डाऊनलोड केले असले तरीही ते भरावे कसे याची माहिती नसल्याने अडचणी येत आहेत.  अनेक ठिकाणी नेटर्वक नसल्याने उमेदवारांना माहिती भरणेही अवघड ठरत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने ॲाफलाईन खर्च सादर करण्याची परवाणगी द्यावी अशी मागणी होत आहे. 

असा सादर करावा लागतो ॲानलाईन खर्चट्रू वोटर ॲप हे एका मोबाईलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण फक्त एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अँड्रॉइड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे.

या आहेत अडचणी...दुर्गम भागात गेल्या काही वर्षात मोबाईचा वापर वाढला असला तरी टूजी आणि थ्रीजी नेटर्वकही योग्य त्या प्रकारे चालत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना अडचणी आल्या होत्या. यामुळे आता निवडणूक खर्च कसा भरावा याबाबत विजयी आणि पराभूत उमेदवारांची घालमेल सुरु झाली आहे. 

दुर्गम भागात आधीच नेटवर्कची अडचण आहे. त्यात आवश्यक असलेला स्मार्ट फोन नाही. त्यामुळे खर्च कसा सादर करू हा प्रश्न आहे. त्यासाठी आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन खर्च सादर करण्याची परवाणगी द्यावी. तसे झाल्यास सर्वच उमेदवार लागलीच खर्च सादर करण्यासाठी पुढे येतील व निवडणूक आयोगाचे कामकाजही सुटसुटीत होईल. -जे.पी.पाटील, निवडून आलेले उमेदवार.

 

उमेदवारी अर्ज सादर करतांनाच अनेकवेळा अडचणी आल्या होत्या. शेवटी निवडणूक आयोगाला ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा द्यावी लागली होती. आता खर्च सादर करण्यास देखील त्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे नंदुरबारसारख्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेणे अपेक्षीत आहे.-सुनिता जाधव, निवडून आलेल्या उमेदवार.