शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कार-डंपर अपघातात अनरदचे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार तर दोन्ही मुले जखमी झाल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार तर दोन्ही मुले जखमी झाल्याची घटना गुजरातमधील निझर-उच्छल रस्त्यावर धारेश्वर नजीक बुधवार, ५ रोजी सकाळी घडली. गिरासे कुटूंब अनरद, ता.शहादा येथे नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. परत वापी (गुजरात) येथे नोकरीच्या ठिकाणी जात असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला.योगेश सरदारसिंग गिरासे (३७) व गायत्री योगेश गिरासे (३१) असे मयतांची नावे आहेत. तर मयंक (१२) व निरज (१०) अशी जखमी बालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश गिरासे हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी अनरद येथे आले होते. गुरुवारी लग्न समारंभ आटोपून ते अनरद येथे मुक्कामी राहिल्यानंतर सकाळी ७ वाजता निझर, उच्छलमार्गे ते वापी येथे जात होते. निझर ते उच्छल दरम्यान धारेश्वर मंदीरालगत त्यांच्या कारला (क्रमांक एमएच ३९-जे १४१२) समोरून येणाऱ्या डंपरने (क्रमांक जीजे २१ व्ही ४४२८) जबर धडक दिली. यात कारचा संपुर्ण चक्काचूर झाला. स्वत: योगेश गिरासे हे कार चालवत होते. त्यांच्या शेजारी पत्नी गायत्री या बसल्या होत्या. त्यामुळे त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले मयंक व निरज हे जखर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी कारचा पत्रा कापून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. निझर येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दोन्ही मुलांवर शहादा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बुधवारी सायंकाळी गिरासे दाम्पत्यावर अनरद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांची सोबतच अंत्ययात्रा निघाल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. योगेश गिरासे हे वापी येथे खाजगी कंपनीत नोकरीस होते.