शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लाभाच्या योजनांचे अनुदान मिळत नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : श्रावणबाळ, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, अपंग  निवृत्ती वेतन आदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : श्रावणबाळ, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, अपंग  निवृत्ती वेतन आदी योजनांच्या माध्यमातून गरीब शेतमजुरांना मिळणारे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्य शेतमजुरांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी तहसीलदार मनोज खैरनार यांनी येत्या आठ दिवसात लाभाथ्र्याच्या खात्यावर अनुदान वितरीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.शेतमजुरांना देण्यात येणा:या अनुदानात केंद्र शासनाच्यावतीने दरमहा 600 रुपयांर्पयत वाढ  करण्यात आली. राज्य व केंद्रातर्फे मिळून सुमारे एक हजार रुपये इतका लाभ देण्यात येणार असून, जुलै महिन्यापासून याची अमंलबजावणी होणार असल्याबाबतचा शासन निर्णयदेखील जाहीर झाला आहे. वृध्द, विधवा, अपंग आदींच्या लाभासाठी मिळणारे निवृत्तीवेतन तहसील कार्यालयातून ऑनलाईन पाठविले जाते. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकांमुळे अनुदान पाठविण्यास विलंब झाला असून, सुमारे सहा महिन्यांर्पयत अनुदान मिळाले नसल्याने या अनुदानावर अवलंबून असणारे बहुतांशी वृध्द वेळोवेळी बँकेत तसेच शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणा:या तहसील कार्यालयाचे उंबरठे  ङिाजवित आहेत. मात्र तरीही  अनुदान मिळत नसल्याने त्यांना निराशेने परतावे लागत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्यावतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन दिले.  याप्रसंगी रामदास मोरे, कमुबाई  ठाकरे, ब्रिजलाल मोरे, कांतीबाई ठाकरे, मनुबाई नाईक, साखराबाई कोळी, सखुबाई कोळी, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.