शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

१५ अंगणवाड्यांमध्ये बालकांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकुण अंगणवाडी केंद्रांपैकी १५ केंद्रांवर एकही बालक आढळून आला आहे. तर ६२ केंद्रांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील एकुण अंगणवाडी केंद्रांपैकी १५ केंद्रांवर एकही बालक आढळून आला आहे. तर ६२ केंद्रांवर १० पेक्षा कमी बालकांची उपस्थिती असल्याची यादी राज्य पोषण संसाधन कक्षामार्फत देण्यात आली आहे. या यादीनुसार अनावश्यक अंगणवाडी केंद्र बंद करीत तसा अहवाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्तनदा व गरोदर मातांसह बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांमार्फत सामाजात कुपोषण निर्माण न होता सुदृढ बालक, त्या बालकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. एवढेच नव्हे तर स्तनदा व गरोदर मातांना वेळेवर व योग्य आहार पुरवठा करीत जन्मणाऱ्या नवजात बालक सुदृढ राहावे शिवाय त्या बालकांसाठी मातांचे आरोग्यही चांगले राहावे, म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे. तर ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता तसेच किशोवयीन मुली यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.पोषण अभियानांतर्गत निर्धारित उद्दीष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याविविध उपक्रमांपैकी आयसीटी-आरटीएम याअंतर्गत रिअल टाईम मॉनिटरिंगद्वारे करण्यात येत आहे. कॉमन एप्लिकेशन सॉफ्टवेअर व्दारे सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती व त्या आधारे योजनेचे संनियंत्रण करण्यात येत आहे.त्यानुसार माहे नोव्हेंबर २०१९ च्या सीएएस अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यातील ३ ते ६ वर्ष वयोगटातील १० पेक्षा कमी मुले शालेय पूर्व शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रकल्प निहाय अंगणवाडी केंद्राची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना यादी देण्यात आली आहे. तसेच आयुक्तालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या भेटी दरम्यान पूर्व शालेय शिक्षणासाठी कमी प्रमाणात मुले येत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे, यावर विचारणा केली असता ३ ते ६ वर्ष वयोगटातील काही बालके आहार घेण्यासाठी येतात व पूर्व शालेय शिक्षण घेत नाहीत अशा सबबी पुढे आलेल्या असल्याचे सांगण्यात आले आहेत.अंगणवाडी केंद्रामार्फत केवळ आहार वाटप करणे एवढेच योजनेचे उद्दीष्टे नसून त्यांना पूर्व शालेय शिक्षण देणे देखील आवश्यक असल्याचे नुमद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिपकाºयांना यादीतील प्रत्येक अंगणवाडी केंद्राचे आपले स्तरावरुन फिजीकल पडताळणी करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.४बालकांची उपस्थिती आडळू न आलेल्या अंगणवाड्यांची यादी बाल विकास सेवा आयुक्तालयामाफॅत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना देण्यात आली आहे. त्यात कोणत्या जिल्ह्यातील अंगणवाडीचा समावेश आहे, असा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.४पडताळणी करत असताना त्या अंगणवाडी केंद्रातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके, ३ ते ६ वयोगटातील बालके व गरोदर व स्तनदा माता यांची संख्या तसेच अंगणवाडी केंद्राची इमारत, सदरच्या अंगणवाडी केंद्रापासून ते जवळची अंगणवाडी किती अंतरावर आहे, अंगणवाडी केंद्रामध्ये समायोजन करता येईल या विविध बाबी विचारात घेऊन अंगणवाडी केंद्र सुरु ठेवावे किंवा अंगणवाडी केंद्र बंद करावे. याबाबत स्पष्ट अहवाल ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे नेमकी कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागून आहे.अक्कलकुवा - १०धडगाव - ३०खुंटामोडी - १४४तळोदा - ०८वरील प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये १० पेक्षा कमी बालकांनी उपस्थिती असल्याचे आढळून आले आहे. त्याची यादी जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे.