१५ अंगणवाड्यांमध्ये बालकांची अनुपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:54 AM2020-01-13T11:54:42+5:302020-01-13T11:54:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकुण अंगणवाडी केंद्रांपैकी १५ केंद्रांवर एकही बालक आढळून आला आहे. तर ६२ केंद्रांवर ...

 अनुप Absence of children in the courtyards | १५ अंगणवाड्यांमध्ये बालकांची अनुपस्थिती

१५ अंगणवाड्यांमध्ये बालकांची अनुपस्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील एकुण अंगणवाडी केंद्रांपैकी १५ केंद्रांवर एकही बालक आढळून आला आहे. तर ६२ केंद्रांवर १० पेक्षा कमी बालकांची उपस्थिती असल्याची यादी राज्य पोषण संसाधन कक्षामार्फत देण्यात आली आहे. या यादीनुसार अनावश्यक अंगणवाडी केंद्र बंद करीत तसा अहवाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्तनदा व गरोदर मातांसह बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांमार्फत सामाजात कुपोषण निर्माण न होता सुदृढ बालक, त्या बालकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. एवढेच नव्हे तर स्तनदा व गरोदर मातांना वेळेवर व योग्य आहार पुरवठा करीत जन्मणाऱ्या नवजात बालक सुदृढ राहावे शिवाय त्या बालकांसाठी मातांचे आरोग्यही चांगले राहावे, म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे. तर ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता तसेच किशोवयीन मुली यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.
पोषण अभियानांतर्गत निर्धारित उद्दीष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याविविध उपक्रमांपैकी आयसीटी-आरटीएम याअंतर्गत रिअल टाईम मॉनिटरिंगद्वारे करण्यात येत आहे. कॉमन एप्लिकेशन सॉफ्टवेअर व्दारे सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती व त्या आधारे योजनेचे संनियंत्रण करण्यात येत आहे.
त्यानुसार माहे नोव्हेंबर २०१९ च्या सीएएस अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यातील ३ ते ६ वर्ष वयोगटातील १० पेक्षा कमी मुले शालेय पूर्व शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रकल्प निहाय अंगणवाडी केंद्राची मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना यादी देण्यात आली आहे. तसेच आयुक्तालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या भेटी दरम्यान पूर्व शालेय शिक्षणासाठी कमी प्रमाणात मुले येत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे, यावर विचारणा केली असता ३ ते ६ वर्ष वयोगटातील काही बालके आहार घेण्यासाठी येतात व पूर्व शालेय शिक्षण घेत नाहीत अशा सबबी पुढे आलेल्या असल्याचे सांगण्यात आले आहेत.
अंगणवाडी केंद्रामार्फत केवळ आहार वाटप करणे एवढेच योजनेचे उद्दीष्टे नसून त्यांना पूर्व शालेय शिक्षण देणे देखील आवश्यक असल्याचे नुमद करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिपकाºयांना यादीतील प्रत्येक अंगणवाडी केंद्राचे आपले स्तरावरुन फिजीकल पडताळणी करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

४बालकांची उपस्थिती आडळू न आलेल्या अंगणवाड्यांची यादी बाल विकास सेवा आयुक्तालयामाफॅत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना देण्यात आली आहे. त्यात कोणत्या जिल्ह्यातील अंगणवाडीचा समावेश आहे, असा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
४पडताळणी करत असताना त्या अंगणवाडी केंद्रातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके, ३ ते ६ वयोगटातील बालके व गरोदर व स्तनदा माता यांची संख्या तसेच अंगणवाडी केंद्राची इमारत, सदरच्या अंगणवाडी केंद्रापासून ते जवळची अंगणवाडी किती अंतरावर आहे, अंगणवाडी केंद्रामध्ये समायोजन करता येईल या विविध बाबी विचारात घेऊन अंगणवाडी केंद्र सुरु ठेवावे किंवा अंगणवाडी केंद्र बंद करावे. याबाबत स्पष्ट अहवाल ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे नेमकी कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागून आहे.

अक्कलकुवा - १०
धडगाव - ३०
खुंटामोडी - १४
४तळोदा - ०८
वरील प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये १० पेक्षा कमी बालकांनी उपस्थिती असल्याचे आढळून आले आहे. त्याची यादी जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे.

Web Title:  अनुप Absence of children in the courtyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.