रेती वाहनांमळे अडला रुग्णवाहिकेचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:20 PM2020-06-06T12:20:20+5:302020-06-06T12:20:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैद्य रेती वाहतुकीमुळे तासभर रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर महिलाले ...

Ambulance road blocked by sand vehicles | रेती वाहनांमळे अडला रुग्णवाहिकेचा रस्ता

रेती वाहनांमळे अडला रुग्णवाहिकेचा रस्ता

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैद्य रेती वाहतुकीमुळे तासभर रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर महिलाले मोठ्या यातनेला सामोरे जावे लागले.
तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील रेखा पावरा ही महिला आठ महिन्यांची गरोदर आहे. त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व पुढील उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता १०८ रुग्णवाहिका तळोदा रुग्णालयातून रूग्ण महिलेस घेऊन निघाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटाचा अंतरावर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैद्य रेती वाहतूकदारांच्या वाहनांनी मोठी कोंडी केली होती. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडचण झाली.
रुग्णवाहिकेचा चालक दिनेश पाटील यांनी वेळोवेळी सायरन वाजवत रस्ता मोकळा करा. रुग्णवाहिकेत रुग्ण उपचारासाठी पुढे जायचे आहे. असे आवाहन करून देखील बेशिस्त वाहतूकदारांनी वाट दिली नाही.
रुग्णवाहिकेत असलेल्या डॉ.चेतन रावताळे यांनी अधिकाऱ्यांना फोन केला असता, वाहतूक कोंडी असलेला रस्ता गुजरात हद्दीत येतोय म्हणून हात झटकले. येथे बेशिस्त वाहतूकदार मुजोरी करीत असतात त्याच्या फटका अनेकांना बसत असतो. यावर कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते गोपी पावरा यांनी केली आहे.


 

Web Title: Ambulance road blocked by sand vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.