शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आमळी-घुन्सी येथील महिलांचा मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : टारगट लोकांविषयी पोलीसात तक्रार दिल्याचा राग येवून पोलिसांनीच कोठडीत डांबले. पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : टारगट लोकांविषयी पोलीसात तक्रार दिल्याचा राग येवून पोलिसांनीच कोठडीत डांबले. पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत न्याय मिळावा यासाठी घुन्सी, ता.अक्कलकुवा येथील परदेशी कुटूंबातील चार महिलांनी मंत्रालय गाठून कैफियत मांडली. शिवाय आत्मदहनाचा इशाराही दिल्याने खळबळ उडाली आहे.घुन्सी येथील रमिला विजेसिंग परदेशी, कमली मानसिंग परदेशी, मोगरा गुलाबसिंग परदेशी या महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोरजी रित्या तडवी, रमेश बुध्या तडवी, दनेश गोरजी तडवी, जयंतीलाल किलया तडवी, बबीता कांतीलाल तडवी, लता दिनेश तडवी, सेवतीबाई गोरजी सर्व रा.रायसिंगपुर ता.अ.कुवा जिल्हा नंदुरबार हे आम्हाला घरी येवुन शिवीगाळ व दमदाटी आणि जिवेठार मारण्याची धमकी देत होते. त्याच्या निषेधार्थ न्याय मिळण्यासाठी पोलिसात अर्ज केला होता.त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ३० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी दहा वाजता अक्कलकुवा पोलीस ठाण्यातून लेडीज पोलीस नसतांना पोलीस कर्मचारी आले व घरात घुसुन आम्हा चौघा महिलांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. नंतर काहीही कारण न देता सोडून दिले. यामुळे परदेशी परिवारातील या महिला भयंकर घाबरल्या. गावातही दहशतीखाली राहू लागले.वारंवारच्या धमकीमुळे आणि जाचामुळे या कुटूंबांचे गावात राहणे मुश्किल झाले. त्यामुळे परदेशी परिवारातील या महिलांनी १० जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याकडे तक्रार अर्ज केला, परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी आम्ही मंत्रालयात आत्मदहनासाठी आलो असल्याचे या निवेदनात म्हटले होते. त्याची दखल घेत मंत्रालय पोलिसांनी या चारही महिलांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश मंत्रालय स्तरावरून अक्कलकुवा पोलिसांना देण्यात आल्याचे समजते. त्या दृष्टीने चौकशी सुरू होणार आहे.