शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चारही पालिकांची वसुली ७० टक्केच्या आतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही नगरपालिका आणि एक नगरपंचायतीतर्फे विविध करांच्या वसुलींसाठी ठोस मोहिम राबविण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चारही नगरपालिका आणि एक नगरपंचायतीतर्फे विविध करांच्या वसुलींसाठी ठोस मोहिम राबविण्यात येत आहे. चारही पालिकांची एकुण वसुली सरासरी ६० ते ६५ टक्के आहे. ती वाढविण्यासाठी पालिकांनी पथके स्थापन केली असून मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.पालिकांच्या वसुली मोहिमेसाठी शासन स्तरावरून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. सरासरी वसुली किमान ८० ते ८५ टक्केपर्यंत गेलीच पाहिजे यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे वसुलीसाठी सर्वच पालिका सरसावल्या आहेत. परंतु मार्च सुरू होऊनही वसुलीची टक्केवारी ६० ते ६५ टक्केपर्यंतच अडकली आहे. ती वाढविण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.मोठे थकबाकीदारजिल्ह्यात मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध त्या त्या पालिकांनी आता मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी अशा थकबाकीदारांची यादीच वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जात आहे. त्यानंतरही असे थकबाकीदार रक्कम भरण्यासाठी पुढे आले नाहीत तर त्यांची यादी पुन्हा ते राहणाऱ्या मुख्य चौकातच होर्र्डींगवर लावण्याचे नियोजन काही पालिकांनी करून ठेवले आहे. त्यानंतर शेवटचा उपाय हा जप्तीचा राहणार आहे.नळ कनेक्शन खंडीत करण्याचाही पर्याय राहणार असल्याचे सांगण्यात आले. अर्थात केवळ दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रिया कशी आणि किती पुर्ण होईल याबाबत शंकाच आहे.विविध बाबीतून सुटपालिका नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासूनच मालमत्ताधारकांना नोटीसा बजावण्यास सुरुवात करतात. नंदुरबार पालिकेने देखील डिसेंबर महिन्यात नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीसा बजावल्या होत्या. नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत व त्यानंतर विविध टप्पे करून विशिष्ट प्रकारच्या रक्कमेची सूट देखील देण्यात आली होती. त्यात दोन टक्केपासून तर दहा टक्केपर्यंतच्या रक्कमेची सूट होती. परंतु तरीही नागरिक ऐनवेळीच थकीत कर भरण्यासाठी पुढे येतात.या आठवड्यात करांचा भरणा करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी गर्दी करण्यापेक्षा वेळेत कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी ध्वनीक्षेपक लावलेल्या रिक्षांद्वारे देखील आवाहन करण्यात येत आहे.शासनातर्फेही तगादाशासनातर्फे पालिकांना जास्तीत जास्त वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. किमान ८५ ते ९० टक्के वसुली झाली पाहिजे अशा सुचना पालिकांना देण्यात आल्या आहेत. वसुलीवरच पालिकांना मिळणारे अनुदान अवलंबून राहणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सुचना देण्यात येत आहेत.

अनेक पालिका वसुलीबाबत मात्र दुजाभाव करीत असल्याचे चित्र दिसून येते. मोठ्या थकबाकीदारांना अभय व लहान परंतु नियमित मालमत्ताकर भरणाऱ्यांकडे तगादा असे चित्र दिसून येते. मोठे थकबाकीदार आपल्याकडील एकुण रक्कमेच्या काही टक्के रक्कम भरून वेळ निभावून नेत असतात. परंतु त्याची थकबाकी ही कायम राहत असते, काही थकबाकीदार पालिकांच्या नोटीसीला आव्हान देत थेट न्यायालयात धाव घेतात. न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यावर ते त्यांच्या पथ्यावर पडत असते.