अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांची १० रोजी जिल्हा परिषदेत चाैकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:16+5:302021-02-05T08:08:16+5:30

यानुसार २०१६ मध्ये सरपंच असलेले अमरसिंग हुपा वळवी, २०१६ चे प्रशासक आर. एम. देव, २०१७ मधील प्रशासक जे. ...

In Akkalkuwa Gram Panchayat malpractice case, nine persons were arrested in Zilla Parishad on 10th | अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांची १० रोजी जिल्हा परिषदेत चाैकशी

अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नऊ जणांची १० रोजी जिल्हा परिषदेत चाैकशी

यानुसार २०१६ मध्ये सरपंच असलेले अमरसिंग हुपा वळवी, २०१६ चे प्रशासक आर. एम. देव, २०१७ मधील प्रशासक जे. एस. बोराळे, २०१७ ते २०१९ या काळातील लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, २०१९ मधील उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, जून २०१९ ते आजतागायत लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करणाऱ्या राजेश्वरी इंद्रवदन वळवी, २०१५ ते २०१८ या काळातील ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, २०१८ ते २०१९ दरम्यानचे ग्रामविकास अधिकारी आनंदा पाडवी, २०१९ ते २०२० पर्यंत ग्रामसेवक एस. आर. कोळी यांची जिल्हा परिषदेत चाैकशी होणार आहे. या चाैकशीकडे अक्कलकुवा शहरासह संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. एकूण चार कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीचा हिशेब संबंधितांकडून १० रोजी सादर होईल किंवा कसे याकडे आता लक्ष लागून राहणार आहे.

Web Title: In Akkalkuwa Gram Panchayat malpractice case, nine persons were arrested in Zilla Parishad on 10th