शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

एकाच दिवसात सहा आदेशांमुळे प्रशासन ॲक्शनमोडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:30 AM

नंदुरबार : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता त्यावर उपाययोजना आणि त्याला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शनमोडवर आले आहे. ...

नंदुरबार : कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता त्यावर उपाययोजना आणि त्याला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता ॲक्शनमोडवर आले आहे. जिल्हाधिकारी यांनी एकाच दिवसात तब्बल सहा आदेश काढले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. काढण्यात आलेल्या आदेशामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन, पालिकांकडून कोविड केअर सेंटर सुरू करणे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड उपचार कक्ष सुरू करणे, रेल्वेचे कोविड रुग्णालय सुरू करणे, लसीकरणाचा वेग वाढविणे आणि कोरोना चाचण्या दिवसाला दोन हजारपर्यंत करण्यासंदर्भातील आदेशांचा त्यात समावेश आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आता कोरोना नियंत्रणासाठी जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे.

रेमडेसिविरबाबत कठोर नियम

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी यांनी कठोर नियम घालून दिले आहेत. गेल्या काही दिवसांत याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ व तारांबळ उडाली होती. वेळ व पैसादेखील वाया गेला होता. ही बाब लक्षात घेता आता जिल्हा रुग्णालय अर्थात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातूनच खासगी कोविड रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शन पुरविले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक हे खासगी रुग्णालयांकडून रेमडेसिविर औषध पुरवठ्याबाबत मागणी स्वीकारतील. ती तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना आवश्यक आहे त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाला अभिप्राय देतील. सहायक आयुक्त हे वितरकांशी समन्वय साधून रेमडेसिविर रुग्णालयांना वितरित करण्याबाबत समन्वय साधतील. कुठलाही रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक रेमडेसिविर घेण्यासाठी फिरणार नाही. केवळ एम.डी. मेडिसिन डॅाक्टरच मागणी नोंदवू शकणार आहे. या बाबीचे उल्लंघन झाल्यास संबंधित डॅाक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी हे याबाबत संपूर्ण चौकशी करतील व त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना देतील.

प्रत्येक पालिका क्षेत्रात सेंटर

प्रत्येक पालिका क्षेत्राअंतर्गत एक कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. पालिकाच ते चालविणार असून, त्यात जेवण, पाणी व स्वच्छता पालिका पुरविणार आहे. डॅाक्टर व नर्सिंग सेवा जिल्हा आरोग्य अधिकारी पुरवतील. ऑपरेटर्स व इतर कामासाठी शिक्षणाधिकारी हे चांगले कर्मचारी, शिक्षक यांच्या नेमणुका करतील व संबंधितांना त्याचे प्रशिक्षणही देतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आरटीपीसीआर वाढणार

n जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये दिवसाला दोन हजार चाचण्यांची तपासणी करून अहवाल नागरिकांना मिळतील याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक हे नियोजन करणार आहेत.

n जिल्हा आरोग्य अधिकारी आवश्यक तेवढ्या प्रमाणात रॅट किट विकत घेतील. हे किट प्राथमिक आरोग्य केंद्र यांना उपलब्ध करून देतील.

n जे रुग्ण रॅपिड चाचणीत बाधित आढळतील त्यांना तत्काळ संस्थात्मक अलगीकरण, विलगीकरण करण्यात येईल.

n जे रुग्ण रॅपिड चाचणीत निगेटिव्ह येतील व लक्षणे आढळतील अशा रुग्णांचे नमुने आरटीपीसीआर चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जातील.

ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचार कक्ष

n अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचारांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहेत याची तपासणी करतील.

n अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक त्या सोयीसुविधा व उपचारावरील औषधी पुरवठा सुनिश्चित करतील.

n सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयांची जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने व्यापक प्रसिद्धी देतील.

n या रुग्णालयात तालुक्यातील लक्षणे असणाऱ्या बाधित व ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक असणाऱ्या रुग्णांवर उपचार करतील.

n जिल्हा शल्य चिकित्सक हे कोविड उपचारासाठी आवश्यक औषधी पुरवठा करतील. रुग्णालयात योग्य कार्यप्रणाली निश्चित करून रुग्णालयाबाहेर फलक लावतील.

गावोगावी लसीकरणावर भर...

n गावोगावी लसीकरणावर भर देण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जबाबदार अधिकारी म्हणून नियुक्त राहतील. शिक्षणाधिकारी हे आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करतील.

n गावनिहार ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांच्या याद्या तयार केल्या जातील. तालुक्याचा गावनिहाय अपेक्षित लोकसंख्येचा गोषवारा, तसेच जिल्ह्याचा तालुकानिहाय अपेक्षित लोकसंख्येचा गोषवारा काढतील.

n मतदार यादी व सेन्साॅसच्या माहितीबाबत पडताळणी करून खात्री करतील. तसेच लोकांमध्ये लस घेण्याबाबत जनजागृती केली जाईल. त्यातील किती लोकांचे लसीकरण करण्यात आले त्याची माहिती जमा करून त्याबाबतचा तालुकानिहाय गोषवारा तयार करून तसा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील.

n गावनिहाय शाळा, समाजमंदिर येथे लसीकरण कॅम्प घेऊन उर्वरित नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण करून घेण्यासाठी संबंधित अधिकारी प्रयत्न करतील.

रेल्वे कोविड सेंटरमध्ये केवळ पुरुष रुग्ण

n नंदुरबार रेल्वे स्थानकात तयार करण्यात आलेल्या रेल्वेच्या कोविड केअर सेंटरमध्ये केवळ पुरुष रुग्णांनाच भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा अधिकारी हे तत्काळ हे सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील.

n तेथे डॅाक्टर व नर्सेस हे मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारीही जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील.

n एकलव्य कोविड सेंटरमध्ये महिला व पुरुष रुग्ण दाखल राहतील, तर तापी कोविड सेंटरमध्ये केवळ महिला रुग्ण दाखल करण्यात येतील.