शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांसमोर समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई बरोबरच अस्वच्छता, सिटी स्कॅन, रक्ताचा रिपोर्ट अशा वेगवेगळ्या समस्यां रूग्णांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई बरोबरच अस्वच्छता, सिटी स्कॅन, रक्ताचा रिपोर्ट अशा वेगवेगळ्या समस्यां रूग्णांनी प्रत्यक्ष आमदारांपुढे मांडल्या. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकूण या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यासाठी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत.राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा येथे केंद्र शासनाने उपजिल्हा रुग्णालय स्थापन केले आहे. साहजिकच रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. परंतु सुविधांपेक्षा रुग्णांना येथे असुविधांचाच अधिक सामना करावा लागत आहे. उपजिल्हा रुग्णालय असतांना तेथे सिटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्त चाचणी, अशा महत्वाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांना खाजगी अथवा नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागत असते. तसेच या तपासणींसाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागत असतो. विशेष म्हणजे रुग्णालयात साधे पुरेशे पाणीदेखील रुग्णांना मिळत नसल्याची रुग्णांची व्यथा आहे. याबाबत प्रशासनाने वरिष्ठ आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला आहे. तरीही संबंधित विभाग लक्ष घालत नसल्याचा आरोप आहे.या उपजिल्हा रुग्णालयात सफाई कामगरांअभावी स्वच्छता देखील होत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. आमदार राजेश पाडवी यांनी अचानक रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी तेथील रुग्णांशी संवाद साधला. उपचाराबाबत रुग्णांना विचारले असता वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पुरेशा उपचार मिळत असला तरी आजाराशी असलेल्या इतर तपासण्यांची येथे व्यवस्था नसल्याने बाहेरून महागडा खर्च करून आणावे लागत आहे. याशिवाय रुग्णालयात पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी रुग्णांनी केली आहे.सफाई कर्मचाऱ्यांअभावी साफ सफाई होत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. दरम्यान आमदार पाडवी यांनी रुग्णालयातील तांत्रिक सुविधांबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. पाण्याच्या सुविधेबाबत कुपनलिकेचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, अद्याप पावेतो कार्यवाही झाली नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. तरीही या प्रस्तावाबाबत चौकशी करावी नाही तर पुन्हा प्रस्ताव तयार करावा व इतर सुविधांप्रकरणी वरिष्ठ पातळीवर कार्यवाही करण्यासाठी तातडीने पत्र पाठविण्याची सूचना प्रशासनास केली. त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक वीरसिंग पाडवी, प्रा.विलास डामरे, विठ्ठल बागले, नीलेश वळवी, किरण सूर्यवंशी उपस्थित होते.