विसरवाडी पोलीसांकडून अवैध मद्यसाठ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:15 IST2019-04-14T12:15:25+5:302019-04-14T12:15:42+5:30
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील बिजगाव येथे विसरवाडी पोलिसांच्या पथकाने अवैध दारू विक्रेते व गावठी हात भट्टीवर धाड टाकून ९८ ...

विसरवाडी पोलीसांकडून अवैध मद्यसाठ्यावर कारवाई
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील बिजगाव येथे विसरवाडी पोलिसांच्या पथकाने अवैध दारू विक्रेते व गावठी हात भट्टीवर धाड टाकून ९८ हजार ५०० रुपयांच्या गावठी हातभट्टी दारू व साधनांचा नाश केला.
बिजगाव ता. नवापूर येथील पुंजऱ्या धवळ्या कोकणी याच्या शेतात ही कारवाई करण्यात आली़ पोलीसांनी पत्री ड्रम, महुफुलांचा वॉश, बांबूची नळी, तांब्याची घागर, सहा प्लास्टिक ड्रम, तीस मातीचे मोठे माठ, मोटारीची काळी ट्यूब, गावठी दारू व महू फुलांचा सडका साठा असा मुद्देमाल नष्ट केला़ पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंदकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, जमादार दयाराम वळवी, हवालदार राजेश येवले, तुषार सोनवणे, विजय वळवी, भगवान गुट्टे, गायकवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली़ याबाबत विजय वळवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात पुंजºया कोकणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत आहेत.